एल के पी मल्टीस्टेटचा लोकार्पण सोहळा हंगिरगे येथे दिमाखात संपन्न
नयनरम्य सोहळ्याकरिता आमदार शहाजीबापू व मा. आमदार दीपकआबा यांचेसह हजारोंची उपस्थिती

सांगोला (प्रतिनिधी):- ग्रामीण अर्थव्यवस्थेला अधिक गती व चालना देण्याकरिता सांगोला तालुक्याच्या पूर्ण टोकाला वसलेल्या हंगीरगे ता. सांगोला येथे एल के पी मल्टीस्टेट को — ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी या संस्थेचा लोकार्पण सोहळा अलोट गर्दी व उत्साही वातावरणामध्ये संपन्न झाला. आपल्या मानदेशी डायलॉग मुळे सर्वत्र प्रसिद्ध पावलेले सांगोला तालुक्याचे लोकप्रिय आमदार एड. शहाजीबापू पाटील यांच्या शुभहस्ते तर महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष तथा माजी आमदार दीपकआबा साळुंखे – पाटील यांच्या अध्यक्षतेखाली या मल्टीस्टेटचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला. यावेळी उद्योगपती भाऊसाहेब रुपनर यांचीही प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी आमदार शहाजीबापू पाटील म्हणाले की, सूर्योदय उद्योग समूहाने सांगोला तालुका व सोलापूर जिल्ह्याच्या परिसरामध्ये आजवर उभ्या केलेल्या अनेक उद्योगधंद्यांमधून शेकडो तरुणांच्या हाताला काम मिळाले असून सूर्योदयाच्या या तरुणांचा आदर्श आज सर्वांनी घेण्याची गरज आहे. संस्थापक अनिल इंगवले यांचा बँकिंग आणि उद्योग क्षेत्रामधील आजवरचा थक्क करणारा प्रवास समाजातील सर्व तरुणांकरिता प्रेरणादायी आहे. सोलापूर जिल्ह्यातील व महाराष्ट्रातील काही शासकीय व सहकारी वित्तीय संस्था अडचणीतून जात असताना जिथे आर्थिक सोयीसुविधा उपलब्ध नाहीत , छोट्या मोठ्या गोष्टींसाठी ज्या ग्रामस्थांना दूर जावे लागत होते. अशा ग्रामीण भागातून नव्या उमेदीने व विशिष्ट ध्येयाने एलकेपी मल्टीस्टेट सारखी संस्था आर्थिक सेवा सुविधा देण्याकरिता पुढे सरसावलेली आहे . ही बाब अत्यंत कौतुकास्पद आहे.
यावेळी माजी आमदार दीपकआबा साळुंखे पाटील मार्गदर्शन करताना म्हणाले की, एल के पी मल्टीस्टेटचे चेअरमन अनिलभाऊ इंगवले व त्यांचे जोडीदार भगत गुरुजी, बंडोपंत लवटे व दिघे गुरुजी यांच्या कामाची खूप मोठी धडाडी असून समाजातील नेमकी गरज ओळखून कितीतरी व्यवसाय व उद्योगधंदे आजवर त्यांनी उभे केलेले आहेत. तीन तालुक्याच्या सीमेवर असलेले हंगिर्गे हे गाव तालुक्यापासून खूप दूर अंतरावर असून अशा प्रकारच्या वित्तीय संस्थेची या ठिकाणी खूप मोठी गरज होती. ग्रामीण भागातील लोकांच्या गरजा ओळखून आपण काम करत आहात ही बाब प्रशंसनीय आहे. हे गाव आणि आजूबाजूच्या पाच दहा गावातील व्यवसायिकांना आपण माफक दरात कर्जपुरवठा करून या भागातील उद्योग आणि व्यवसायाला उभारी द्यावी अशी सूचना देखील त्यांनी यावेळी केली. उद्योजक भाऊसाहेब रुपनर यांनीही स्वच्छ व पारदर्शी कारभार करत ग्राहकांना जास्तीत जास्त लोकाभिमुख सेवा देण्याबाबत सूचना केल्या. व संस्थेच्या होत असलेल्या प्रगतीला आणि शाखा विस्ताराला शुभेच्छा दिल्या.
यावेळी मंचावर ज्येष्ठ नेते किसन आबा गायकवाड, हंगेरगे गावचे सरपंच साबळे, मा. जि प सदस्य अनिल भाऊ मोटे, घेरडीचे सरपंच पिंटू पूकळे, रासपचे नेते सोमा आबा मोटे, दिलीप मोटे, उद्योजक संजय साळुंखे ,महादेव दिघे, बिभीषण सावंत, बाबुराव वाघ ,मधुकर कोळेकर ,सदाशिव सावंत, दादासाहेब सावंत, बंडू साबळे ,श्रीकृष्ण काटे, आबासो काटे ,रामभाऊ पूकळे ,दादासो सावंत, वसंत सावंत, सुभाष सावंत ,दिलीप सावंत, विनायक कुलकर्णी सर ,डॉ. सुशीलकुमार शिंदे ,अशोक सावंत, डॉ.सचिन काळे, सुरेश काटे सर ,बीराजी घु, श्रीनिवासदादा करे ,अमोघसिद्ध कोळी ,चंद्रकांत करांडे ,कोमल सातपुते ,कांचन चव्हाण ,दत्तात्रय मळगे, विजयकुमार पोरे, सर्जेराव वाघ ,विलास पावणे, बाबुराव पूकळे ,दीपक बंदरे साहेब ,रामचंद्र लांडगे, अशोक चोरमले, हरीबा गावडे, नितीन सावंत , पोपट गुजले, अशोक गावडे इत्यादी मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सुरुवातीला प्रास्ताविकामध्ये संस्थेचे चेअरमन अनिलभाऊ इंगवले यांनी या भागात मल्टीस्टेटची शाखा उभारण्या पाठीमागील भूमिका विशद केली व संस्थेविषयी सखोल माहिती आणि संस्थेमध्ये असलेल्या विविध प्रकारच्या ग्राहकयोगी सुविधा यांची माहिती सांगत ठेवीच्या देखील विविध प्रकारच्या योजना त्यांनी समोर मांडल्या. शेवटी उपस्थित सर्वांचे आभार संस्थेचे संचालक जगन्नाथ भगत यांनी मांनले. गावातील मुख्य बाजारपेठेमध्ये पुरेशी इमारत, त्यामध्ये सुसज्ज व अत्याधुनिक फर्निचर, कार्यक्रमासाठी आकर्षक स्टेज, हलग्यांचा कडकडाट, फटाक्यांची आतिषबाजी , ड्रोन कॅमेरा चे चित्रण , महिला वर्ग ,युवक वर्ग, ज्येष्ठ मंडळी व पंचक्रोशीतील ग्रामस्थ यांची खूप मोठी उपस्थिती यामुळे हा कार्यक्रम संस्मरणीय ठरला. अत्याधुनिक सेवा सुविधांनी युक्त असलेली व महाराष्ट्र आणि कर्नाटक अशी दोन राज्य कार्यक्षेत्र असलेली संस्था या भागात उभारल्यामुळे परिसरांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.