ग्रंथमिञ गुलाबराव पाटील गुणवंत शिक्षक पुरस्काराने सन्मानित

ग्रंथालय चळवळीसाठी योगदान देणारे सामाजिक कार्यात शिक्षण सेवेत निस्वार्थीपणे काम करणारे एक आदर्श व्यक्तीमत्व कामातून आपली ओळख निर्माण करणारे सोलापूर जिल्हा ग्रंथालय संघाचे मा. अध्यक्ष ,दिपकआबा सांळुखे-पाटील प्रा.शि.सहकारी पतसंस्था सांगोला चे संस्थापक चेअरमन , सोलापूर जिल्हा प्रा.शि सहकारी पतसंस्थेचे विद्यमान संचालक तसेच महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाचे संचालक या पदावर कार्यरत असलेले ग्रंथमिञ गुलाबराव पाटील यांचा अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला जिल्हा समिती सोलापूर यांच्यावतीने गुंडाप्पा झाडबुके स्मृती गुणवंत शिक्षक पुरस्कार डॉ. निर्मलकुमार फडकुले सभागृह सोलापूर येथे अखिल भारतीय साने गुरुजी कथामालेचे कार्याध्यक्ष श्री.लालासाहेब पाटील व उपस्थित मान्यवरांच्या उपस्थितीत स्मृतीचिन्ह सन्मानपत्र शाल ग्रंथ श्रीफळ पुरस्कार देऊन सहकुटूंब परिवार त्यांचा गौरव केला
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी बालसाहित्यिका डाॕ.श्रुती वडगबाळकर यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमासाठी सांगोला तालुक्यातून शिक्षक वृंद मिञ परिवार ,शिक्षक संघटनेतील मान्यवर तसेच ग्रंथालय चळवळीचे सक्रिय कार्यकर्ते ग्रंथमिञपरीवार मोठ्या संख्येने उपस्थित राहून पाटील गुरुजींना भावी कार्याच्या शुभेच्छा दिल्या.व्यासपीठावर अध्यक्ष अशोक खानापूरे ,कोषाध्यक्ष अशोक म्हणाने आदी मान्यवर उपस्थित होते.उपस्थितांनी आपले मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे सूञसंचालन उपाध्यक्ष आरती काळे यांनी केले.



