महात्मा गांधी जयंती निमित्त यलमार मंगेवाडी पायोनियर शाळेमध्ये भाषण व निबंध स्पर्धेचे आयोजन.

खंडोबा बहुउद्देशीय संस्था संचलित पायोनियर पब्लिक स्कूल सीबीएससी येथे 2 ऑक्टोंबर 2024 रोजी गांधी जयंती साजरी करण्यात आली.
महात्मा गांधींचे जीवन एक प्रेरणादायी उदाहरण आहे. त्यांनी अहिंसेच्या मार्गाने अन्याय आणि अत्याचारांविरुद्ध लढा दिला. त्यांच्या कार्याची महत्ता आजही आपल्याला शिकवते की शांततेने आणि सत्याने कोणतेही उद्दिष्ट साध्य करता येऊ शकते.  ब्रिटिश राजवटीपासून भारताच्या स्वातंत्र्याच्या लढ्यात महात्मा गांधीजींचे महत्वाचे योगदान आहे. अशा या एका प्रमुख नेत्यावर लिहिलेला निबंध व केलेले भाषण विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती  गुणनिर्माण करण्याचा प्रयत्न करते. व ते करण्यासाठी शाळा नेहमीच प्रयत्नशील असते
या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून संस्थेचे संचालक माननीय श्री अनिल येलपले सर उपस्थित होते.  शाळेचे प्राचार्य श्री सतीश देवमारे सर यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम सुरळीत पार पाडण्यात आला. शाळेतील सर्व शिक्षकांनी मुलांना निबंध लेखनाची आणि भाषण लेखनाची तयारी करून घेतली आणि अशा प्रकारे  हा कार्यक्रम करण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button