सांगोला:- सांगोला तालुक्यातील सर्व माध्यमाच्या सर्व व्यवस्थापनाच्या शाळांना “मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा क्र. २”या उपक्रमामध्ये सहभाग असून एकूण ५०२ शाळांनी स्कूल पोर्टल वर स्वताच्या शाळांचे मूल्यमापन केले होते. त्यानुसार सर्व शाळांची तपासणी केंद्रप्रमुख यांनी स्वताःचे केंद्र वगळता इतर केंद्राचे मूल्यमापन केले आहे. केंद्रातून प्रथम येणाऱ्या जि प गट व सर्व साधारण इतर गटातील शाळांचे मूल्यमापन तालुकास्तरीय समितीने गुणांचे मूल्यमापन केले आहे.
तालुकास्तरीय मूल्यमापन समितीचे अध्यक्ष मा. गट विकास अधिकारी वर्ग -1 यांचे अध्यक्षतेखाली शाळांची तपासणी झाली, त्यानुसार “मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा क्र. २ “उपक्रमामध्ये जिल्ह्यात जि प शेळकेवाडी प्रथम तर तालुक्यात जि प शाळा घेरडी प्रथम क्रमांक पटकाविला आहे. तालुक्यातील प्रथम शाळा शेळकेवाडी ही सन २०२३-२४ मध्ये प्रथम क्रमांक मिळविला असून त्यांना जिल्हास्तरीय समितीने शाळा तपासणी मा. अधिव्याख्याता, जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था वेळापूर व मा. गट शिक्षण अधिकारी पंढरपूर तसेच मा. शिक्षण विस्तार अधिकारी माळशिरस यांनी केली आहे. त्यामध्ये जिल्ह्यात शेळकेवाडी केंद्र शिवणे शाळेची गुणानुक्रमे प्रथम निवड करण्यात आली आहे.
सांगोला तालुक्यातील जि प शाळा गट प्रथम क्रमांक जि प शाळा घेरडी, द्वितीय क्रमांक जि प शाळा बाबरसपताळवाडी केंद्र अकोला व तृतीय क्रमांक जि प शाळा बनकरवाडी केंद्र सांगोला व सर्व साधारण इतर गट मध्ये प्रथम क्रमांक सिंहगड पब्लिक स्कूल कमलापूर, द्वितीय क्रमांक महात्मा फुले विद्यालय, डोंगरगाव व तृतीय क्रमांक सांगोला विद्यामंदिर प्रशाला, सांगोला यांना गुणांकन मूल्यमापन द्वारे घोषित करण्यात येत आहे. सर्व विजेत्या शाळांचे गट विकास अधिकारी आनंद लोकरे, गटशिक्षणाधिकारी सुयोग नवले, शिक्षण विस्तार अधिकारी श्री. कुमठेकर, श्री. भंडारी व सर्व केंद्रप्रमुख यांनी पुढील कार्यास शुभेच्छा देऊन अभिनंदन केले