तुळजापूर होऊन देवीची ज्योत घेऊन येताना अपघात; दोघांचा जागीच मृत्यू तर 19 जण जखमी
तुळजापूर होऊन देवीची ज्योत घेऊन येताना वेगातील पिकअप पलटी होऊन झालेल्या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू तर 19 जण जखमी झाल्याची घटना मंगळवेढा सोलापूर महामार्गावर कामती खुर्द गावाजवळ घडली.या घटनेने ऐन घटस्थापनेच्या दिवशी गोणेवाडी गावावर शोककळा पसरली
यामध्ये प्रदीप क्षीरसागर व नेताजी कराळे या दोघांचा जागीच मृत्यू झाला असून यामध्ये महेश बंडगर, वैभव हजारे, सोचल मुलाणी, रोहित माने, रोहित कसबे, समाधान मासाळ, किरण हजारे, दादा लोखंडे,राजू होरे, सुहास मासाळ, समाधान तरटे,सौरभ क्षीरसागर, अभिजीत कसबे, दयानंद बंडगर, आप्पासाहेब मासाळ,सागर मलपे, विश्वजीत मासाळ, अक्षय कांबळे, संतोष मोहिते, हे जखमी झाल्याची माहिती मिळत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष रामेश्वर मासाळ यांनी घटनास्थळी त्यांना माहिती मिळतात तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन किरकोळ जखमींना मंगळवेढा येथील खाजगी रुग्णालयात तर गंभीर जखमींना सोलापूर येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
अपघाताचे वृत्त समजतात गोणेवाडी ग्रामस्थांनी सध्या सोलापूरकडे धाव घेतली. नवरात्र महोत्सवाच्या निमित्ताने दुचाकीच्या पुंगळ्या काढून सर्वसामान्य नागरिकांना त्रास देण्याचा प्रयत्न सुरू आहे याकडे पोलीस प्रशासनाने दुर्लक्ष केले पण दुपारनंतर दुचाकीच्या पुंगळ्या काढून कोणाला शहरात फिरणाऱ्या या दुचाकी स्वरांना पोलीस निरीक्षक महेश ढवान यांनी चांगलाच हिसका दाखवून ५ ० हुन अधिक दुचाकी गाड्या पोलीस स्टेशनमध्ये जमा केले आहेत.
——————————————————————–
गोणेगाव वाडी गावांमध्ये दिवसभर गाव बंद ठेवून या अपघातामध्ये मरण पावलेल्या गावातील नागरिकांनी श्रद्धांजली वाहिली.यावेळी नातेवाईकांचा टाहो फोडला.अपघात ग्रस्त भाविकांची आमदार समाधान आवताडे भगीरथ भालके, गुलाबराव थोरबोले नितीन पाटील ,अनिल सावंत, मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी भेट देऊन विचारपूस करत सांत्वन केले
———————————————————————