कोळा विद्यामंदिरचे शिष्यवृत्ती परीक्षेत दैदीप्यमान यश

कोळा (वार्ताहर) महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद,पुणे यांचेकडून जुलै 2022 मध्ये घेण्यात आलेल्या इ.5 वी आणि इ.8 वी शिष्यवृत्ती परीक्षेत कोळा विद्यामंदिर हायस्कूलमधील विद्यार्थ्यांनी जिल्हास्तरावर प्राविण्य राखत उज्ज्वल यश संपादन केले आहे.इ.5 वी मधील 26 विद्यार्थ्यांपैकी 11विद्यार्थी पात्र झाले असून एक विद्यार्थी जिल्हा गुणवत्ता यादीत तर इ.8 वी मधील 24 विद्यार्थ्यांपैकी 16 विद्यार्थी पात्र झाले असून 5 विद्यार्थी जिल्हा गुणवत्ता यादीत चमकले आहेत.
यामध्ये कुमार जावीर प्रज्वल बिरदेव(इ.5 वी-जिल्हा ग्रा.108 वा),कुमार मोरे सुजल अविनाश (इ.8 वी-जिल्हा ग्रा.149 वा),कुमारी आलदर अश्विनी बाबासो (इ.8 वी-जिल्हा ग्रा.199 वी),कुमारी बोधगिरे स्नेहल लिंगराज (इ.8 वी-जिल्हा ग्रा.227 वा),कुमारी डोईफोडे श्वेता महादेव (इ.8 वी-जिल्हा ग्रा.290 वा),कुमारी आलदर साधना परमेश्वर (इ.8 वी-जिल्हा ग्रा.A1/4 वा)या विद्यार्थ्यांनी जिल्हास्तरावर गुणवत्ता प्राप्त केली आहे.
या विद्यार्थ्यांना इ.5 वीसाठी विभागप्रमुख श्री. ए.जी.सरगर यांच्यासह कुमारी नागरसे मॅडम, कुमारी कुकडे मॅडम, सौ. देशमुख मॅडम, श्री.आर्.एस्.आलदर, श्री भांगरे सर , इ.8 वीसाठी विभागप्रमुख एन्.डी.कांबळे यांच्यासह , श्री.डी.पी.सांगोलकर, श्री.एस्.व्ही.कोळेकर, श्री उजनीकर सर, शालाबाह्य विभाग प्रमुख श्री.आदाटे सर, तांबोळी मॅडम यांनी मार्गदर्शन केले.
यशस्वी विद्यार्थी आणि मार्गदर्शक शिक्षकांचे संस्थाध्यक्ष प्रा.प्रबुद्धचंद्र झपके,सचिव म.शं. घोंगडे,खजिनदार शं.बा.सावंत,सहसचिव प्रशुद्धचंद्र झपके तसेच कार्यकारिणी सदस्य विश्वेश झपके साहेब यांच्यासह मुख्याध्यापक श्री.नारायण विसापुरे, प्रभारी मुख्याध्यापक श्री. मणेरी र.ज.सर आणि सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी आणि ग्रामस्थांनी कौतुक करुन शुभेच्छा दिल्या आहेत.