सांगोला येथे कट फ्रेश फ्रुट व कट फ्रेश व्हिजिटेबल प्रकल्पास प्रारंभ
सांगोला (प्रतिनिधी):- सांगोला येथील कृषी विकास सहकारी संस्थेच्या वतीने सांगोला तालुका व परिसरातील शेतकर्यांच्या हिताच्या दृष्टीने मुख्यमंत्री कृषी अन्नप्रक्रिया योजनेअंतर्गत गोल्ड स्टोरेज रेखातपूर पाटी सांगोला येथे कट फ्रेश फ्रुट व कट फ्रेश वेजिटेबल हे दोन नवीन प्रोजेक्ट हाती घेतले असून सदरचे दोन्ही प्रकल्पाचे काम पूर्ण झाले आहे.
शेतकरी व सभासदांच्या हिताच्या दृष्टीने सदर प्रकल्प हाती घेतले आहेत कारण सांगोला तालुक्यामध्ये मुख्य फळपीक डाळिंब असल्यामुळे पहिल्या टप्प्यात संस्था डाळिंबावर काम करणार आहे यामध्ये संस्थेच्या माध्यमातून डाळिंबाची वॉशिंग (डाळिंब स्वच्छ करणे), शॉर्टिंग (खराब डाळिंब काढणे), पिलिंग(डाळिंब सोलणे), डाळिंबातील खराब दाणे काढणे व दाणे साफ करणे व ते हवाबंद 100 ग्रॅम ते पाच किलो पर्यंतचे पॅकिंग हवाबंद करून ग्राहकांच्या गरजेनुसार बाजारपेठेत पुरवठा करणे अशा प्रकारे डाळिंबावर सेमी प्रोसेस (अर्धप्रक्रिया प्रकल्प) केला जाणार आहे त्यामुळे शेतकर्यांच्या मालाला देशांमध्ये व देशाबाहेर सुद्धा चांगली बाजारपेठ मिळणार आहे. ग्राहकांच्या गरजेनुसार चांगल्या प्रतीची फळे व स्वच्छ भाजीपाला मिळण्यास मदत होणार आहे.
या प्रकल्पाचे कमाल 3 टप्प्यात असून पॅक हाऊसचे एसी चे काम पूर्ण झाले आहे त्याचप्रमाणे मालवाहतुकीसाठी एसी रेफर व्हॅन (वाहन) कंटेनर संस्थेने खरेदी केला आहे.
सदरचा प्रकल्प पूर्णत्वास आला असून सदर कामाची पाहणी करण्यासाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री शुक्राचार्य भोसले, कृषी उपसंचालक श्री.डेडे, जिल्हा संशोधन संसाधन अधिकारी श्री पठाण, लीड बँक प्रतिनिधी श्री साठे, उपविभागीय कृषी अधिकारी श्री बाळासाहेब लांडगे, तालुका कृषी अधिकारी दिपाली जाधव या अधिकार्यांनी सदर प्रकल्पाची पाहणी व तपासणी करून एकूण सर्व कामकाजाबद्दल समाधान व्यक्त केले आहे.