सांगोला( प्रतिनिधी) : सांगोला तालुक्याचे लोकप्रिय आमदार शहाजीबापू पाटील यांनी लोणारी समाजाच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेला विषय म्हणजे लोणारी समाज आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यासाठी राज्य सरकारकडे, मागणी व सातत्याने पाठपुरावा करून मंजूर करून घेतला.. यासंदर्भात आमदार शहाजीबापू पाटील यांनी वारंवार केलेल्या पाठपुराव्याला मोठे यश प्राप्त झाले आहे. या निर्णयाबद्दल आमदार शहाजीबापू पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार तसेच इतर मागास बहुजन कल्याण हा मंत्री अतुल सावे यांचे विशेष आभार मानले आहेत.
राज्यभरात सर्वत्र लोणारी समाज विस्तारित स्वरूपात पाहायला मिळतो. लोणारी समाज आर्थिक विकास महामंडळ स्थापन व्हावे ही या समाजाची गेल्या अनेक वर्षापासूनची मागणी होती. लोणारी समाजाने आमदार शहाजीबापू पाटील यांच्याकडे या संदर्भात मागणी केली होती. मागील महिन्यात लोणारी समाज बांधवांनी तहसील कार्यालय समोर या मागणीसाठी आमरण उपोषण केले होते. यावेळी आमदार शहाजीबापू पाटील यांनी लोणारी समाजाच्या महत्त्वपूर्ण असलेल्या या मागणीची दखल घेत समाजाच्या असलेल्या मागण्या मुख्यमंत्र्याकडे मांडून त्या सोडवल्या जातील असे आश्वासन दिले होते . अखेर लोणारी समाजाचा हा प्रश्न सोडवण्यात आमदार शहाजीबापू पाटील यांना मोठे यश आले आहे. आमदार शहाजीबापू पाटील यांनी सांगोला येथे लोणारी समाजभवन उभारणीसाठी 2 कोटी रुपये निधी मंजूर केला.
लोणारी समाजाच्या तरुणांना राज्य सरकारने आर्थिक विकास महामंडळ स्थापन करून उद्योग व्यवसाय आणि अन्य क्षेत्रात मदतीचा हात दिला आहे . लोणारी समाजाच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या विषयावर राज्य सरकारने अतिशय महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. सांगोला तालुक्यातील तसेच राज्यभरातील लोणारी समाजाने सरकारच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे .सरकारच्या या महत्वपूर्ण निर्णयाने लोणारी समाज बांधवांचा खऱ्या अर्थाने विकास होण्यास मोठी मदत झाली आहे. तसेच तरुणांचा रोजगाराचा प्रश्नही मार्गी लागणार आहे.
लोणारी समाजाच्या दृष्टीने सकारात्मक निर्णय घेतल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजितदादा पवार तसेच इतर मागास बहुजन कल्याणमंत्री अतुल सावे त्यांच्यासह राज्य सरकारचे विशेष आभार मानले. शासनाने घेतलेल्या निर्णयाचे लोणारी समाज बांधवांनी स्वागत करीत आमदार शहाजीबापू पाटील यांचे विशेष आभार व्यक्त करित लोणारी समाजबांधव आमदार शहाजीबापू पाटील यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतील असे आश्वासन दिले.