इनरव्हील क्लब सांगोला कडून डोंगरगाव येथील जळीत बाबर पाटील कुटुंबाला मदतीचा हात.

सांगोला( प्रतिनिधी):- डोंगरगाव येथील जळीत ग्रस्त बाबर पाटील कुटुंबियांना इनरव्हील क्लब सांगोला यांच्याकडून संसार उपयोगी वस्तू, किराणामाल, साड्या ,रोख रक्कम मदत करण्यात आली.
रमेश बाबर पाटील राहणार डोंगर यांच्या शेतातील घराला दुपारी अचानक आग लागली व क्षणातच संपूर्ण साहित्य व धान्याचा कोळसा झाला ही माहिती गावातील सरपंचाकडून मिळतात इनरव्हील क्लबच्या महिलांनी मदतीचा हात पुढे केला. त्यांच्याशी बोलताना त्या म्हणाल्या वाऱ्याने चुलीचा जाळ इतरत्र पसरून आग लागली व क्षणार्धात सगळे होत्याचे नव्हते झाले. तुम्ही आमच्यापर्यंत मदतीचा हात घेऊन आल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद.आणी महत्त्वाचे म्हणजे मदती पेक्षाही इतक्या सर्व महिला एकत्र होऊन आमच्या भेटीसाठी व आमची विचारपूस करण्यासाठी आल्या आहेत याचे आम्हाला फार कौतुक वाटले. व त्यांनी ते बोलूनही दाखवले. बोलताना त्या फार भावनिक झाल्या .आणि बऱ्यापैकी मदत करून त्यांना थोडाफार आपण आधार दिला आहे हे आपल्यालाही समाधान झाले.
ह्या प्रोजेक्टसाठी क्लब अध्यक्ष सविता लाटणे, अश्विनी कांबळे, माधुरी गुळमीरे ,वनिता चव्हाण, वर्षा बलाक्षे , स्वाती ठोंबरे ,राधा चांडोले ,संगीता चौगुले, अरुणा घोंगडे ,अनिता कमले ,सीमा गवळी ,व डोंगरगावच्या सरपंच उपस्थित होत्या.