शेअर बाजारात रोजगाराच्या अफाट संधी :डॉ.अजित पाटील

सांगोला महाविद्यालयात अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष आणि अर्थशास्त्र विभागाच्या वतीने आयोजित दि.30 सप्टेंबर 2024 रोजी भारतीय अर्थव्यवस्था आणि शेअर बाजार या विषयावर व्याख्यान संपन्न झाले. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. अजित पाटील (सेबी संस्था विषयक मार्गदर्शक व सीडीएसएल चे व्याख्याते, मुंबई) हे लाभले. तर कार्यक्रमाचे अध्यक्ष पद महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. एस. आर.भोसले यांनी भूषविले.
व्याख्यान आयोजित करण्याचे मुख्य उद्देश हे विद्यार्थ्यांनी भारतीय अर्थव्यवस्थेतील शेअर बाजाराविषयी माहिती घेणे, शेअर बाजारातील विविध मूलभूत संकल्पना, सेबी, सीडीएसएल, एनएसडीएल, डिमॅट खाते, शेअर्सची खरेदी विक्री इत्यादी विषयी माहिती मिळवणे हे होते.
यावेळी कार्यक्रमात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्रमुख पाहुणे डॉ. अजित पाटील म्हणाले की, भारतीय शेअर बाजार हा आशिया खंडातील मोठा शेअर बाजार आहे. इतर देशातील गुंतवणूकदारांची तुलना करता भारतीय गुंतवणूकदारांचे शेअर बाजारातील गुंतवणकीचे प्रमाण कमी आहे. याविषयी बऱ्याच गुंतवणूकदारांना गुंतवणुकी विषयी पूर्णता माहिती नसल्याचे सांगितले. शेअर बाजारातील व्यवहार, शेअर्सची खरेदी विक्री,सेबी, याविषयी विद्यार्थ्यांना सखोल माहिती दिली. याबरोबरच कार्यक्रमाच्या शेवटच्या भागात त्यांनी शेअर बाजारात रोजगार विषयक असणाऱ्या संधीची सखोल माहिती विद्यार्थ्यांना दिली.महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. सुरेश भोसले यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतात म्हणाले कि, अर्थशास्त्र हा दैनंदिन जीवनातील एक महत्त्वाचा विषय असून या भांडवली बाजारात रोजगाराच्या नवनवीन संधी निर्माण होत आहेत आणि यांचा शोध आपल्या विद्यार्थ्यांनी घेतला पाहिजे असे मत व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ. एम.डी.वेदपाठक यांनी केले. तर पाहुण्यांचा परिचय डॉ. बाबर एन. ए. यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बी.ए.भाग.२ मधील विद्यार्थिनी श्रुती गडहिरे यांनी केले. कार्यक्रमाचे आभार प्रा. गोडसे पी. डी. यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सौ.भुंजे एस.एस. यांनी विशेष प्रयत्न केले. या कार्यक्रमासाठी इंग्रजी विभाग प्रमुख डॉ.ए.आर मासाळ, वाणिज्य विभाग प्रमुख डॉ. सौ. विद्या जाधव, प्रा.सौ.भाग्यश्री पाटील, प्रा. प्रज्ञा काटे ,प्रा.सचिन सुरवसे, प्रा.कु.प्राप्ती लामगुंडे, इतर प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील प्रभारी प्राचार्य,प्राध्यापक व प्रशासकीय सेवक आणि विद्यार्थी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.