फॅबटेक एज्युकेशन सोसायटी पुणे संचलित फॅबटेक पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमध्ये महात्मा गांधी जयंती व लालबहादूर शास्त्री जयंती साजरी करण्यात आली.
“सत्य आणि अहिंसा हाच धर्म आहे सत्य हा देव आहे आणि अहिंसा ही त्या देवाची आराधना आहे हा मार्ग शिकवणारे राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि जय जवान जय किसान चे उद्घोषक थोर स्वातंत्र्यसेनानी , भारताचे दुसरे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त प्रशालेचे प्राचार्य श्री सिकंदर पाटील, ए.ओ. वर्षा कोळेकर, सुपरवायझर सौ वनिता बाबर यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून विनम्र अभिवादन करण्यात आले.या प्रसंगी कु.राजवर्धन शिंदे याने महात्मा गांधी यांची वेशभूषा केली. तसेच अनुक्रमे कु.राजनंदिनी गायकवाड, स्माही घोंगडे, स्वरा साळुंखे, आचल येड्रावकर, ओंकार खरात,राधेय क्षिरसागर या विद्यार्थ्यांनी महात्मा गांधी,व लालबहादूर शास्त्री यांच्या विषयी माहिती विद्यार्थ्यांना सांगितली. स्वच्छता ही सेवा या अभियानांतर्गत स्कूलमध्ये विविध उपक्रम राबविले.
स्कूलमधील विद्यार्थ्यांना परिसरातील स्वच्छतेची शपथ सौ.फरीदा मुलाणी यांनी दिली.स्कूलमधील स्वच्छता कर्मचारी यांचा प्राचार्य श्री सिकंदर पाटील यांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.स्कूलमध्ये म.गांधी जयंती निमित्त रंगभरण स्पर्धा व निबंध लेखन स्पर्धा घेण्यात आली. तसेच स्कूलच्या मैदानावरील स्वच्छता विद्यार्थ्यांनी केली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.फरीदा मुलाणी यांनी केले.