*सांगोला विद्यामंदिरमध्ये वन्यजीव सप्ताहानिमित्त व्याख्यान व वृक्षारोपण

सांगोला (प्रतिनिधी) सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळ संचलित सांगोला विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेज सांगोला येथे १ ऑक्टोबर ते ७ ऑक्टोबर वन्यजीव सप्ताहाचे औचित्य साधत सांगोला वनपरिक्षेत्र अधिकारी तुकाराम जाधवर यांचे वन्यजीव निसर्ग साखळी व मुलांची शिस्त याविषयी व्याख्यान व सांगोला वनपरिक्षेत्राकडून देण्यात आलेल्या ‘ वृक्षांचे वृक्षारोपण’ कार्यक्रम आयोजित केला होता.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मार्गदर्शन करताना जाधवर यांनी वन्यजीव संरक्षण व जतन काळाची गरज आहे असे प्रतिपादन केले.
यावेळी व्यासपीठावर सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळ सांगोला सचिव मल्लिकार्जुन घोंगडे,सांगोला विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य अमोल गायकवाड,वनरक्षक अचकदानी वनिता इंगोले, वनरक्षक सांगोला जी.बी.व्हरकटे, सांगोला विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेज उपमुख्याध्यापिका शहिदा सय्यद, उपप्राचार्य प्रकाश म्हमाणे,पर्यवेक्षक सुरेश मस्तुद उपस्थित होते.
पुढे बोलताना वनपरिक्षेत्र अधिकारी जाधवर यांनी वन्यजीव प्राणी यांची माहिती, वन्यजीव संरक्षण, जतन, वन्यजीव प्राण्यासंदर्भात संकेतस्थळाचा योग्य वापर करून योग्य माहिती द्यावी चुकीची माहिती दिल्यास गुन्हा नोंद होतो, वन्यजीव प्राणी कायदे, नुकसान भरपाई विषयी माहिती, झाडांचे अनन्यसाधारण महत्त्व, वनपरिक्षेत्र नोकरीची संधी व विद्यार्थ्यांना शिस्तीविषयी खूप अनमोल मार्गदर्शन केले.
कार्यक्रमानंतर सांगोला विद्यामंदिर,सांगोला येथे वनपरिक्षेत्र कार्यालयाकडून देण्यात आलेल्या वृक्षांचे प्रशासकीय अधिकारी, शिक्षक व विद्यार्थी यांचे उपस्थितीत वृक्षारोपण करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी सांगोला विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेजचे शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.धनाजी चव्हाण यांनी केले तर उपप्राचार्य प्रकाश म्हमाणे यांनी आभार प्रदर्शन केले.