सांगोला (प्रतिनिधी): सांगोला तालुका शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळ, सांगोला या संस्थेचे अध्यक्ष व युवा नेते डॉ. अनिकेत (भैय्या) देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त शुक्रवार दि 4 ऑक्टोबर रोजी डॉ. गणपतराव देशमुख महाविद्यालय येथे टेक्नोत्सव 2k24 कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाचे पहिले सत्र हे स्वागत समारंभाचे सत्र होते.
त्यामध्ये कार्यक्रमाची सुरुवात सांगोला तालुक्याचे भाग्यविधाते कै.आ.डॉ. भाई गणपतरावजी देशमुख साहेब यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. त्यानंतर प्रमुख मान्यवरांच्या स्वागत समारंभाचा कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. पांडुरंग लवटे सर यांनी केले. प्रास्ताविकानंतर प्रमुख पाहुणे अमोल लेंडवे सर यांनी आपले मनोगत व्यक्त केले तसेच प्रमुख पाहुणे टेक्नॉलॉजी वरती आपले व्याख्यान दिले. संस्थेचे सचिव श्री विठ्ठलराव शिंदे सर यांनी आपल्या अध्यक्ष मनोगतात टेक्निकल ज्ञानावर विद्यार्थ्यांनी भर द्यावा असे सांगितले. कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सिकंदर मुलाणी सर संगणक विभाग प्रमुख प्राध्यापक कळवले सर हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री अमोल लेंडवे सर हे पुण्यामध्ये विप्रो या कंपनीत चांगल्या पॅकेजवर नोकरीत आहेत. कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात ‘वेब डिझाइनींग’ आणि ‘टेक्निकल क्वीज’ असे दोन राऊंड पार पडले. वेब डिझाईन मध्ये प्रथम क्रमांक हा डी बी एच सोनी कॉलेज सोलापूर यांच्या विद्यार्थी कु. अमन मर्चंट यांनी पटकावला, तर व्दितीय क्रमांक के बी पी कॉलेज पंढरपूर यांच्या विद्यार्थीनी कु वैष्णवी कुलकर्णी यांनी पटकावला व तृतीय क्रमांक डॉ. गणपतराव देशमुख महाविद्यालय, सांगोलाचा विद्यार्थी कु. वेदांत गणेश कोकरे यांनी पटकावला.
टेक्निकल क्वीजमध्ये प्रथम क्रमांक कु. बनकर अनिकेत अशोक डॉ. गणपतराव देशमुख महाविद्यालय सांगोला यांनी पटकावला तर द्वितीय क्रमांक विभागून प्रवीण प्रभाकर घाडगे व गणेश विलास क्षीरसागर शिवाजी पॉलिटेक्निक कॉलेज सांगोला यांनी पटकावला,
तर तृतीय क्रमांक डी बी एच सोनी कॉलेज सोलापूर यांच्या वैभवी अनिरुद्ध गायकवाड यांनी पटकावला.सदर स्पर्धांचे परीक्षक म्हणून अमोल लेंडवे सर व प्रकाश कोळेकर सर यांनी काम पाहिले.
कार्यक्रमाच्या तिसरे सत्र हे निरोप समारंभाचे सत्र म्हणून संपन्न झाले. त्यामध्ये यशस्वी विद्यार्थ्यांना बक्षिस व ट्राफी वाटप करण्यात आले. तसेच प्रातिनिधिक स्वरूपांत काही विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. सदर स्पर्धेमध्ये डी बी एच सोनी कॉलेज सोलापूर आय.सी.एम.एस. कॉलेज पंढरपूर, संगमेश्वर महाविद्यालय सोलापूर, फॅबटेक कॉलेज सांगोला, शिवाजी पॉलिटेक्निक कॉलेज सांगोला, श्रीराम इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन अँड टेक्नॉलॉजी पाणीव ,सांगोला महाविद्यालय सांगोला व इतर अनेक प्रतिष्ठित महाविद्यालयातील अनेक विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवून कार्यक्रमाची शोभा वाढवली होती. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ. गणपतराव देशमुख महाविद्यालय, सांगोला मधील बी.एस्सी (ई.सी.एस.) भाग-3 आणि बी.सी.ए. भाग-3 मधील विद्यार्थी,विद्यार्थीनी व महाविद्यालयातील व संगणकशास्त्र विभाग तील सर्व प्राध्यापक व प्राध्यापिका, चतुर्थ श्रेणी कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमात विशेष सहकार्य प्रथमेश मने आणि त्यांच्या टीमने घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन कु. ऐश्वर्या पठाणशेट्टी , आरती शिंदे, ऋतुजा कोळेकर, प्रविणा मने यांनी केले व आभार प्रदर्शन प्रणाली पाटील आणि राधिका पोळ यांनी केले.