सांगोला (वार्ताहर) मुख्यमंत्री- माझी शाळा, सुंदर शाळा-टप्पा 2 अंतर्गत तालुकास्तरीय तपासणीमध्ये सांगोला विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेज सांगोला या शाळेची खाजगी व्यवस्थापन गटातून सांगोला तालुक्यातून तृतीय क्रमांकाने निवड झाली.
सन 2024-2025 मध्ये मुख्यमंत्री- माझी शाळा, सुंदर शाळा- टप्पा 2 संपूर्ण महाराष्ट्र राज्यात राबविण्यात आला. ही स्पर्धा जि.प.शाळा आणि खाजगी अनुदानित, विनाअनुदानित अशा दोन गटात घेण्यात आली. प्रत्येक गटातून प्रत्येक तालुक्यातून तीन क्रमांक काढण्यात आले.
प्रत्येक शाळेतील पायाभूत सुविधा -33 गुण, शासनाच्या ध्येय-धोरणांची अंमलबजावणी -74 गुण, शैक्षणिक संपादणूक -43 गुण अशा तीन घटकांवर आधारित 150 गुणांची विहित नमुन्यात केंद्र स्तर तपासणी करण्यात आली. केंद्रात प्रथम क्रमांक आलेल्या शाळांची त्यानंतर तालुका स्तर तपासणी करण्यात आली. या तपासणीमध्ये सांगोला विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेज, सांगोला या शाळेने गुणांची उत्तम संपादणूक करत तालुक्यात तृतीय क्रमांक मिळविला आहे.
याकरिता प्राचार्य अमोल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्यमंत्री-माझी शाळा, सुंदर शाळा या विभागाच्या नियंत्रक उपमुख्याध्यापिका सौ.शाहिदा सय्यद, उपप्राचार्य प्रकाश म्हमाणे, पर्यवेक्षक सुरेश मस्तुद, मच्छिंद्र इंगोले, प्रदीप धुकटे, प्रा. इसाक मुल्ला, मुस्तफा नदाफ, आशपाक काझी, मेहेर ढवळे यांच्यासह प्रशालेतील सर्व शिक्षक-शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
प्रशालेच्या या यशाबद्दल सां.ता.शि.प्र. मंडळाचे अध्यक्ष प्रा.प्रबुद्धचंद्र झपके सर, सचिव मल्लिकार्जुन घोंगडे, खजिनदार शंकरराव सावंत, सहसचिव प्रशुद्धचंद्र झपके साहेब, कार्यकारणी सदस्य विश्वेशजी झपके यांनी सर्व प्रशासकीय अधिकारी, शिक्षक-शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत.