रोटरी क्लब सांगोला यांच्या वतीने श्री अंबिका देवी मंदिर, सांगोला येथे सर्वांसाठी मोफत रक्त तपासणी शिबिर घेण्यात आले. या शिबिरामध्ये रक्त शर्करा तपासून त्याचा रिपोर्ट लाभार्थी यांना देण्यात आला.
या तपासणी शिबिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांपैकी १०० जणांनी तपासणी करून घेतली. या कार्यक्रमाप्रसंगी सेवेस तत्पर असणाऱ्या पोलिस व होमगार्ड बंधू भगिनी यांनी कार्यक्रमाचा लाभ घेऊन कौतुक केले.या कार्यक्रमाप्रसंगी सांगोला रोटरी क्लबचे अध्यक्ष रो.इंजि.विकास देशपांडे व रो.इंजि.विलास बिले यांनी रक्त तपासणी करून घेण्याचे महत्व सांगितले.
या रक्त तपासणी शिबिरासाठी संजीवनी पॅथॉलॉजी लॅब व प्रकल्प प्रमुख रो.डॉ.महादेव कोळेकर यांचे बहुमोल सहकार्य लाभले. या शिबिराचा फायदा लोकापर्यंत पोहोचवण्यासाठी रोटरी सदस्य रो.डॉ.साजिकराव पाटिल रो.श्रीपती आदलिंगे व रो.शरणाप्पा हळीसागर यांनी बहुमोल सहकार्य केले. या कार्यक्रमास लाभार्थीची नोंद ठेवण्यासाठी रो.अरविंद डोंबे व रो.प्रा. महादेव बोराळकर यांची विशेष मदत झाली.
या कार्यक्रमास रोटरी सदस्य रोटरी संतोष गुळमिरे,रो. मिलिंद बनकर,रो.इंजि.अशोक गोडसे,रो.अड.सचिन पाटकुलकर,रो. रामेश्वर कमले,रो.संतोष भोसले,रो. गजानन भाकरे,रो.प्रा.बुगड सर हजर होते तसेच अंबिका देवी मंदिराचे पुजारी श्री.गुरव यांचे विशेष सहकार्य लाभले.