जवळे(प्रशांत चव्हाण) जगाच्या हितासाठी जो मार्गदर्शन करतो तो खरा संत आहे कारण जगाचा उद्धार झाला पाहिजे जगाचा विकास झाला पाहिजे संत मला मंगळ वाटतात ज्ञान मिळवायचे असेल तर संतांच्या मार्गाने गेलं पाहिजे कारण प्रारब्ध बदलायची ताकद फक्त संतांमध्ये आहे असे मौलिक विचार ह भ प दगडू नाना महाराज आवताडे मु.पोस्ट विरवडे तालुका मोहोळ यांनी जवळे येथे सुरू असलेल्या ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व नवरात्र महोत्सवात व्यक्त केले.
पुढे बोलताना महाराज म्हणाले काशी विश्वनाथाने एका ब्राह्मण व्यक्तीला स्वप्नात येऊन सांगितले की संत दर्शना शिवाय तुझा उद्धार होणार नाही.म्हणून संतांचे दर्शन घे काशी विश्वनाथाला ब्राह्मणाने दंडवत घातला आणि म्हणाला मी धन्य झालो. म्हणून महाराज म्हणतात ‘पुत्र व्हावा ऐसा त्याचा तिन्ही लोकी झेंडा’असे सांगत महाराजांनी उपस्थित भाविक भक्तांना श्रवणीय कीर्तन सेवेचाआनंद दिला.
या कीर्तनामध्ये गायक,मृदंगमणी,टाळकरी,विण्याचे सेवेकरी चोपदार यांची मोलाची साथ लाभली. तत्पूर्वी पहाटे काकडा सकाळी ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण दुपारी भजन सायंकाळी प्रवचन,हरिपाठ हे कार्यक्रम संपन्न झाले. हे सर्व कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री.चंद्रकांत देशमुख गुरुजी,श्री.दीपक चव्हाण,श्री. बंडू सुतार,श्री.रमेश आप्पा साळुंखे श्री.आबासाहेब बावदाने यांनी परिश्रम घेतले. याप्रसंगी जवळे पंचक्रोशीतील महिला व पुरुष भाविक भक्त उपस्थित होते.