सरगरवाडी प्रा. शाळेचे शिक्षक दिगंबर शिंदे गुरुजी यांचा सत्कार

जय विजय प्राथमिक शिक्षक पतसंस्था अकलूज यांचेकडून सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक म्हणून जि.प. प्रा. शाळा सरगरवाडी दिगंबर शिंदे गुरुजी यांना सन्मानित केल्याबद्दल त्यांचा सरपंच संजय सरगर यांच्या शुभहस्ते शाळेत सत्कार करण्यात आला.
सदर प्रसंगी सरपंच संजय सरगर, सोसायटी संचालिका नयना पाटील, यांनी शिंदे गुरुजींच्या कार्याचा आढावा सांगितला. यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा राजश्री आदाटे, सदस्य दामोदर आलदर, सुभाष चौगुले, रावसाहेब चौगुले, शिक्षक राजाराम पाटील, सिद्धनाथ धुकटे, अंगणवाडीच्या तुळसाबाई सरगर, प्रियांका घोडके, शिक्षक, ग्रामस्थ, विद्यार्थी उपस्थित होते. शेवटी मुख्याध्यापक राजाराम तेली यांनी सर्वांचे आभार मानले.