सांगोला विद्यामंदिरमध्ये महिलांसाठी आरोग्यविषयक व्याख्यान

सांगोला ( प्रतिनिधी) धनवर्धन वेल्थ प्रा.लि.कोल्हापूर, सांगोला विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेज,सांगोला व लायन्स क्लब ऑफ सांगोला यांचे संयुक्त विद्यमाने सांगोला विद्यामंदिर, सांगोला येथे ‘ओ वुमनीया ! महिलांसाठी आरोग्यविषयक माहिती व मनोरंजन या कार्यक्रमामध्ये ‘ वुमेन्स मेनोपॉज’ याविषयावरील व्याख्यानामध्ये जीवनशैलीत बदल घडवून आणले, तर बहुसंख्य आजार दूर पळू शकतात, आधीपासून असलेले आजार नियंत्रित राहतात. महिलांनी समतोल आहार, व्यायाम, पुरेशी झोप आणि ताणतणावावर नियंत्रण असा जीवनशैलीत बदल केला तर तो निरामय आरोग्याची गुरुकिल्लीच आहे.असे प्रतिपादन डॉ.अजय चौगुले यांनी केले.
यावेळी व्यासपीठावर धनवर्धन वेल्थच्या संचालिका निर्मला कोळवणकर सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळ सांगोला सहसचिव प्रशुद्धचंद्र झपके, कार्यकारिणी सदस्या शीला झपके, रेमने सर,सांगोला विद्यामंदिरचे प्राचार्य अमोल गायकवाड, उपमुख्याध्यापिका शहिदा सय्यद,पर्यवेक्षक सुरेश मस्तुद उपस्थित होते.
पुढे बोलताना डॉ.चौगुले यांनी महिलांचे आरोग्य, वुमेन्स मेनोपॉज,हार्मोन्स, मासिक पाळी संदर्भातील आजार, याविषयी माहिती दिली व महिलांचे प्रश्न व शंकांचे निरसन केले.
कार्यक्रमाची सुरुवात संस्थापक अध्यक्ष कै.गुरूवर्य चं.वि तथा बापूसाहेब झपके व बाईसाहेब झपके यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व गणेश वंदनाने झाली.यावेळी धनवर्धन वेल्थच्या संचालिका निर्मला कोळवणकर यांनी प्रिया’ज लेटरच्या माध्यमातून स्त्रियांनी स्वतःच्या हक्कासाठी नेहमी तत्पर राहत कोणत्याही अनपेक्षित घटनेला सामोरे गेले पाहिजे.त्याचबरोबर आरोग्यासोबत आर्थिकदृष्ट्या सजग असले पाहिजे असे सांगितले.
कार्यक्रमामध्ये मृदगंध ग्रुपमधील नीरज शेटे,प्रिया कुलकर्णी,महेश वासुदेव,सायली नाईक यांनी मराठी, हिंदी गीते सादर करत सर्वांचे मनोरंजन केले व कार्यक्रमाला रंगत आणली.
या कार्यक्रमासाठी धनवर्धन वेल्थचे पदाधिकारी शीतल लवटे, गणेश पाटील यांच्यासह महिला शिक्षिकेंची उपस्थिती मोठ्या संख्येने होती.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनुपमा गुळमिरे यांनी केले तर आभार प्रदर्शन महेश बासुदेव यांनी केले.