महुद येथे चोरट्यांनी पळविली 74 हजारांची तांब्याची वायर
सांगोला(प्रतिनिधी):-कोणीतरी अज्ञात चोरट्याने दुकानाचे पत्रा शेडचे शटर व पञा कापुन आत प्रवेश करुन 74 हजार रुपये किंमतीची पाण्याच्या मोटारची नवीन व जुनी तांब्याची वायर लंपास केली असल्याची घटना दि.8 डिसेंबर 2024 रोजी महुद ता.सांगोला येथे घडली.
चोरीची फिर्याद स्वप्नील विकास देशमुख (धंदा- दुकान रा. महुद ता. सांगोला जि. सोलापुर) यांनी सांगोला पोलीस स्टेशनला दिली आहे.
चोरट्यांनी 50 हजार रुपये किंमतीची अंदाजे 200 किलो वजनाची पाण्याची मोटारची तांब्याची नवीन वायर व 24 हजार रुपये किंमतीची अंदाजे 160 किलो वजनाची पाण्याची मोटारची तांब्याची जुनी वायर असे एकुण 74 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल पळवून नेला आहे.
फिर्यादी यांचे सांगोला महुद रोडवर अकलुज चौकात मोटार सामान दुरुस्तीचे व विक्रीचे पञा शेडचे समर्थ इलेक्ट्रीकल नावाचे दुकान आहे. दिनांक 08 डिसेंबर रोजी रात्री 8 वाजता नेहमी प्रमाणे फिर्यादी दुकान बंद करुन घरी गेले होते. त्यानंतर दि.09 डिसेंबर रोजी नेहमी प्रमाणे सकाळी 6 वाजता फिर्यादी दुकानाकडे आले असता दुकानाचे पञा शेडचे शटर उचकटुन पत्रा कापलेला दिसला त्यावेळी फिर्यादी यांनी घरातील तसेच मिञ, नातेवाईक यांना बोलावुन घेवुन दुकानात आत जावुन पाहिले असता दुकानातील पाण्याच्या मोटारची नवीन व जुनी तांब्याची वायर चोरी झाल्याची दिसली त्यावेळी खात्री झाली कि कोणीतरी अज्ञात चोरट्याने पञा उचकटुन आत प्रवेश करुन चोरी केली असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.