सांगोला(प्रतिनिधी):- उतार वयात ज्येष्ठ नागरिकांनी एकत्र येणे,संवाद साधणे,हितगुज साधणे गरजेचे असुन लहान पणीची शाळेतील मैत्री अविट असते…गेल्या पन्नास वर्षात एकदाही न भेटलेले तुम्ही मित्र या दोन वर्षात तिसर्यांदा शाळेच्या प्रांगणात भेटत आहात, एकमेकाशी संवाद साधत आहात, ही गौष्ट कौतुकास्पद आहेत,असे मत प्रा.प्रबुद्धचंद्र झपके यानी व्यक्त केले.
सांगोला विद्यामंदिर प्रशालेतील एस.एस.सी.1974 सालच्या विद्यार्थ्यानी सलग तिसरे मित्रसंमेलन शाळेत आयोजित केले होते. त्या वेळी प्रमुख अतिथी म्हणून प्रा.प्रबुद्धचंद्र झपके बोलत होते..कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वर्गमैत्रिण वनमाला पैलवान- डोंबे या होत्या..व्यासपीठावर सर्व गुरुजन उपस्थित होते..
कार्यक्रमाची सुरुवात गुरुवर्य कै .बापुसाहेब झपके यांच्या प्रतिमापुजनाने झाली…कार्यक्रमात सर्व वर्गमित्र व मैत्रीणीनी स्वयं परिचय करून दिला..वर्गमित्र व गझल अभ्यासक डॉ.अविनाश सांगोलेकर मित्रसमेलनाचे प्रवर्तक प्रा.राजेंद्र ठोंबरे व कवयत्रि मनिषा ठोंबरे यांचा उल्लेखनीय कार्याबद्दल सत्कार करण्यात आला..त्याचप्रमाणे 1 जुन हा सरकारी वाढदिवस असल्याने ज्यांचा वाढदिवस आहे’अशा मित्र व मैत्रीणीना पुस्तक भेट देवुन सन्मानित करण्यात आले.त्याच प्रमाणे सर्व गुरुजनांचा सत्कार करण्यात आला.
सदर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन भीमाशंकर पैलवान, ’प्रास्ताविक डॉ.अविनाश सांगोलेकर व आभार प्रदर्शन सुभाष महिमकर यानी केले.. अध्यक्षिय मनोगत वनमाला डोंबे यानी व्यक्त केले.या कार्यक्रमात 50 हून अधिक मित्रमैत्रीणी उपस्थित होते..डौ.हणमंत गावडे यांची पुढील वर्षाचे अध्यक्ष म्हणून एकमताने निवड करण्यात आली..दुसर्या सत्रात विनोद’,गाणी ,गप्पा गोष्टी,शालेय आठवणी यात सगळेजण रंगून गेले होते.