सांगोला- भविष्यातील एमपीएससी, यूपीएससी व विविध स्पर्धा परीक्षेची माहिती व्हावी तसेच इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेची पूर्वतयारी व्हावी यासाठी जि प प्राथमिक शाळा सांगोलकर गवळीवस्ती ( तरंगेवाडी) शाळेत विविध स्पर्धा परीक्षेची तयारी करून घेतली जाते. जि प प्रज्ञाशोध परीक्षा, मंथन, केंद्रप्रमुख प्रज्ञाशोध व आयटीएसई परीक्षेत शाळेच्या विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीत स्थान मिळवले आहे.
जि प प्रज्ञाशोध परीक्षेत इयत्ता चौथीमधून 200 पैकी स्वाती खताळ- 168 गुण, ऋतुजा बंडगर- 158 गुण मिळवून गुणवत्ता यादीत आले असून इयत्ता सातवीमधून स्वीटी गावडे हिने 156 गुण मिळवून सांगोला तालुक्यात तिसरा क्रमांक प्राप्त केला आहे.तसेच सन 2024- 25 मध्ये घेण्यात आलेल्या मंथन प्रज्ञाशोध परीक्षेत सुद्धा इयत्ता तिसरीमधून विद्या गावडे – 268 गुण, श्रेयश खताळ- 230 गुण मिळवून गुणवत्ता यादीत आले तर इयत्ता चौथीमधून स्वाती खताळ- 258 गुण, ऋतुजा बंडगर- 234 गुण मिळून गुणवत्ता यादीत आले आहेत.त्याचप्रमाणे केंद्रप्रमुख प्रज्ञाशोध परीक्षेत इयत्ता चौथीमधून दोन विद्यार्थ्यांनी प्रत्येकी 1000 रुपयाचे बक्षीस, ट्रॉपी व प्रमाणपत्र प्राप्त केले आहे
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे सत्कार शाळेचे मुख्याध्यापक सुहास कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले. सर्व गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना शाळेचे शिक्षक खुशालद्दिन शेख, गणेश व्हनखंडे व अण्णा गावडे यांचे मार्गदर्शन लाभले. विविध स्पर्धा परीक्षेत विद्यार्थी गुणवत्ता यादीत आल्याबद्दल सर्व यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकाचे गटशिक्षणाधिकारी सुयोग नवले, विस्तार अधिकारी अमोल भंडारी, लक्ष्मीकांत कुमठेकर, केंद्रप्रमुख तानाजी साळे, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा लतिका गावडे व पालकाकडून कौतुक करण्यात आले