महाराष्ट्र

डॉ बाबासाहेब देशमुख यांच्या खांद्याला खांदा लावून साथ देणार ~ खा धैर्यशील मोहिते पाटील

कोळा येथे शेतकरी कामगार पक्ष व आघाडीचा जाहीर मेळावा संपन्न

कोळा जिल्हा परिषद गटातील सर्व आघाडीच्या शेकापक्षाच्या कार्यकर्त्यांनी एकोपा ठेवून सर्व मित्र पक्षांना बरोबर घेऊन काम केले पाहिजे बाबासाहेब देशमुख यांच्या विषयी बोलताना म्हणाले त्यांच्या कार्यकर्त्यांच्या मनात जे चालले आहे तेच माझ्या मनात आहे कार्यकर्त्यांनी नव्या जोमाने कामाला लागावे सांगोला तालुक्याचे विकासाला डॉ बाबासाहेब देशमुख यांच्या खांद्याला खांदा लावून साथ देणार आहे असे विचार माढा लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी व्यक्त केले.
कोळा येथील अर्जुन चौकात विराट रेकॉर्ड ब्रेक गर्दीच्या सत्कार समारंभ वेळी खासदार धैर्यशील मोहिते पाटील बोलत होते. खासदार विशाल दादा पाटील कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी आमदार रामहरी आप्पा रुपनर चेअरमन उत्तमराव जानकर बाबुराव गायकवाड अरविंद पाटील शेतकरी कामगार पक्षाची चिटणीस दादाशेठ बाबर चेअरमन प्रभाकर माळी कोळा गावचे शेतकरी कामगार पक्षाचे प्रमुख ज्येष्ठ नेते तुकाराम दादा आलदर पुढारी कोळा गावचे शेकापचे नेते रामा दाजी आलदर, ज्येष्ठ नेते संगम आप्पा धांडोरे पुरोगामी अध्यक्ष दीपक गोडसे यांच्यासह सर्व नेतेमंडळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
खासदार धैर्यशील मोहिते पाटील पुढे म्हणाले आपण डॉक्टर साहेबा बाबासाहेब देशमुख यांना जनतेला बैलगाडा शर्यती दिलेला शब्द पाळणार आहे महाराष्ट्राचे राजकारण सध्या वेगळ्या वळणावर गेले आहे जातीजातीमध्ये भेदभाव निर्माण करण्याचे काम सरकारने काम केले आहे.कोळा गटातून दहा हजारापेक्षा जास्त शेतकरी कामगार पक्षाला मता धिक्य देखील मिळाले पाहिजे कार्यकर्त्यांचा उत्साह ऊर्जा पाहून समाधान व्यक्त करून हीच ऊर्जा निवडणुकीच्या वेळी मतदानापर्यंत कायम ठेवावी असे त्यांनी सांगितले.
स्वागत अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब देशमुख शेतकरी कामगार पक्षांचा स्वर्गीय भाई गणपतराव देशमुख आबासाहेब यांचा विचार कार्यकर्त्यांनी शेवटपर्यंत सोडायचा नाही सर्वांनी एकत्र मिळून काम करायचं तालुक्यावर लाल बावटा फडकवण्याचा आपला निर्धार आहे पाच वर्षात तालुक्यात काय घडले सर्व जनतेला माहित आहे आबासाहेब यांचे विचार रुजवण्याचे काम तालुक्यात करणार तसेच या सर्वसामान्य जनतेच्या गोरगरीब नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी मी प्रयत्नशील राहणार अशी त्यांनी डॉ देशमुख यांनी ग्वाही दिली. अनेक मान्यवर नेते मंडळींनी आपले मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमास कोळा जिल्हा परिषद गटातील डोंगर पाचेगाव कोळा कराडवाडी कोंबडवाडी गौडवाडी जुनोनी हातीद जुजारपूर तिप्पेहळी काळू बाळूवाडी गुणापवाडी या गावासह तालुक्यातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी जिल्हा परिषद सदस्य भाई गजेंद्र कोळेकर सर्वांचे स्वागत प्रा कुंडलिक आलदर भाई रफिक तांबोळी सूत्रसंचालन प्रा मारुती सरगर उपस्थित आभार ॲड धय्याप्पा आलदर यांनी मानले.
या कार्यक्रमाचे शेतकरी कामगार पक्ष पुरोगामी युवक संघटना जिल्हा परिषद गट उत्तम तात्या कोळेकर सोपान कोळेकर तुकाराम कोळेकर कोळा लोकप्रिय नेते रमेश कोळेकर पत्रकार जगदीश कुलकर्णी वसंत आलदर राजाराम मदने बाळासाहेब कोळेकर अंबादास सरगर समाधान बोबडे अजित देशमुख अनिकेत पोरे संतोष गोरड संतोष कोळेकर यांच्यासह गटातील सर्व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button