महाराष्ट्र
टॅलेंट हंट स्पर्धेत जि प प्राथमीक शाळा वझरे चे घवघवीत यश

तालुकास्तरीय टॅलेंट हंट स्पर्धेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वजरे शाळेने घवघवीत यश मिळवले आहे. यामध्ये अमूल्या रेड्डी चित्रकला स्पर्धेत तिसरा क्रमांक, श्रावणी वाघमारे कथाकथन स्पर्धेत द्वितीय क्रमांक, रोहन कोकरे वक्तृत्व स्पर्धेत केंद्रात तृतीय क्रमांक मिळवला आहे.
सदर विद्यार्थ्यांना शाळेतील शिक्षक श्रीमती गुरव मॅडम, श्रीमती पाटील मॅडम, गाडेकर गुरुजी, वाघमारे मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले आहे. यशस्वी विद्यार्थ्यांचे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुरेश रेड्डी, उपाध्यक्ष नितीन निंबाळकर, सदस्य वसंत पाटील, पालक महेश वाघमारे, प्रशांत रेड्डी, सचिन कोकरे, सुभाष कोकरे, भारत रेड्डी, हमीद कुरेशी, अंगणवाडी शिक्षिका लता महामुनी, मल्हारी वाघमारे, समाधान शेठ यादव इ.नी विद्यार्थी व शिक्षकांचा सत्कार केला.