महाराष्ट्र

विधानसभा निवडणूक काळात जिल्हाधिकारी यांचे निर्बंध

मा. भारत निवडणूक आयोगाने दिनांक 15ऑक्टोबर 2024 रोजी अन्वये विधानसभा सार्वत्रिक निवडणूक- 2024 चा कार्यक्रम घोषित झाल्याच्या दिनांकापासून आदर्श आचार संहिता अंमलात आली आहे. सोलापूर जिल्हयामध्ये विधानसभा निवडणूक 2024 ची संपूर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्याय वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीकोणातून भारतीय नागरीक सुरक्षा संहिता-2023 चे कलम 163 अन्वये आणि मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 33 (एन) मधील तरतुदीनुसार जिल्हादंडाधिकारी, सोलापूर कुमार आशीर्वाद (भा.प्र.से.), यांच्या अधिकारान्वये खालील प्रमाणे निबंध घालण्यात येत आहेत.

  विधानसभा निवडणूक प्रचार मोहीमेच्या कालावधीत सर्व राजकीय पक्षाचे उमेदवार, निवडणूक लढविणारे उमेदवार आणि त्यांचे कार्यकर्ते आणि हितचिंतक हे वाहनांवर ध्वनीक्षेपक बसवून मोठ्या आवाजातून प्रचार केल्यास ध्वनी प्रदुषण होणे, सर्वसामान्य लोकांच्या जीवनातील शांततेस व स्वास्थास बाधा पोहोचण्याची व उशीरा रात्री पर्यंत ध्वनीक्षेपण यंत्रणा चालु ठेवण्यावर निर्बंध घालण्यात येत आहेत.

 कोणतीही व्यक्ती, संस्था पक्ष कार्यकर्ते यांनी ध्वनीक्षेपकाचा (लाऊडस्पिकरचा) वापर पोलीस अधिकाऱ्याचे परवानगी शिवाय करता येणार नाही.

 सकाळी 6 वाजण्यापुर्वी आणि रात्री 10 वाजेनंतर कोणत्याही फिरत्या वाहनावर व कोणत्याही क्षेत्रात. ध्वनीक्षेपकाचा वापर करता येणार नाही. प्रचाराकरीता ध्वनी क्षेपकाचा वापर विशिष्ट ठिकाणी थांबुनच करावा, फिरणाऱ्या वाहनास रस्त्यावरुन धावत असतांना ध्वनिक्षेपकाचा वापर करण्यास प्रतिबंध असेल, सर्व राजकीय पक्ष आणि उमेदवार व इतर व्यक्तींनी निश्चीत ठिकाणी ध्वनी क्षेपकाच्या वापरासंबंधीच्या परवानगीची माहीती जिल्हादंडाधिकारी, संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी व संबंधीत यंत्रणेस कळविणे बंधनकारक राहील.तसेच राजकिय पक्षांनी निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांनी किंवा त्यांच्या प्रतिनिधींनी ,मुद्रणालयाच्या मालकांने व इतरमाध्यमाव्दारे छापाई करणाऱ्या मालकांनी मतपत्रिका छापताना खालील बाबींवर निर्बंध असतील. इतर उमेदवरांचे नाव व त्यांनी नेमुन देण्यात आलेले चिन्ह वापरणे नमुना मतपत्रिकेसाठी आयोगाने निश्चित केल्याप्रमाणे  कागद वापरणे. आयोगाने निश्चित केलेल्या कागदाच्या आकारामध्ये  नमुना मतपत्रिका छापणे. इ. सार्वजनिक मालमत्ता विद्रुपीकरणास प्रतिबंध करण्याबाबत विधान सभा निवडणूकीच्या कालावधी मध्ये नगरपालिका नगरपंचायत व ग्रामिणभागात  शासकीय निमशासकीय सार्वजनिक मालमत्तेची  प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष स्वरूपात सक्षम प्राधिकाऱ्याचे  पूर्वपरवानगी शिवाय होर्डीग्ज ,बॅनर्स, पोस्टर्स व भिंतीवर जाहिरात प्रदर्शित करण्यास निवडणूक होईपर्यंत 25 नोव्हेंबर 2024 निर्बंध घालण्यात आले आहेत.तसेच जिल्ह्यातील धार्मिक स्थळे, रुग्णालये , किंवा शैक्षणिक संस्था व सार्वनिक ठिकाणचे जवळपास तात्पुरत्या स्वरूपात पक्ष कार्यालय स्थापन करण्यावर निर्बंध आहेत.

तसेच कोणत्याहि राजकिय पक्षांनी ,निवडणुक लढविणाऱ्या उमेदवारांनी किंवा त्यांच्या प्रतिनिधीनी विधानसभा निवडणूक प्रचार रॅलीमध्ये 10 पेक्षा जास्त मोटार गाड्या ,वाहने नसावेत ,व 10 गाड्यांमध्ये 100 मिटर अंतर असावे.जिल्हादंडाधिकारी ,उपविभागीय दंडाधिकारी, तालुका दंडाधिकारी कार्यालय तसेच जिल्ह्यातील सर्व शासकीय  निमशासकीय कार्यलय, शासकीय विश्रामगृह , सार्वजनिक ठिकाणे, रस्त्यावर कोणत्याहि राजकिय पक्षाने  व्यक्तीने ,संघटनेने ,निवडणूक लढविणाऱ्या उमेदवाराने किंवा त्याच्या हितचिंतकाने धरणे आंदोलन, मोर्चा, निदर्शने उपोषण करण्यावर निर्बंध घालण्यात येत आहेत.

उमेदवारांचे नामनिर्देशन दाखल करते वेळी निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालय आवारात वाहनांच्या ताफ्यात तीन पेक्षा अधिक वाहने नसावे. निवडणूक अधिकारी यांच्या दालनात फक्त पाच व्यक्ती उपस्थित राहतील. नामनिर्देशनपत्र दाखल करते वेळी निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय  आावारात मिरवणूक ,सभा घेणे, घोषणा देणे, वाद्य वाजवणे किंवा गाणे म्हणणे ,कोणताही निवडणूक प्रचार करण्यास निर्बंध घालण्यात येत आहेत. व आचारसंहिता काळात दि.25 नोव्हेंबर 2024 पर्यंत हा आदेश लागू राहिल.प्रचाराचे साहित्य सार्वजनिक इमारतीच्या ठिकाणी ,सार्वजनिक रस्त्यावर निवडणूकी सबंधी पोस्टर्स ,बॅनर्स,पॉम्प्लेट, कटऑऊट ,होर्डींग ,कमानी, इ. रहदारीस अडथळा निर्माण होईल व अपघात होईल अशा पध्दतीने लावण्यावर निर्बंध राहतील.

कोणत्याहि राजकीय पक्षांनी ,प्रतिनिधींनी निवडणूकीच्या प्रचारासाठी झेंड्याच्या काठया उभारणे, कापडी फलक लावणे, भित्तीपत्रक लावणे, घोषणा लिहिणे इत्यादी करीता खाजगी जागा, इमारत, आवार, भिंती, इत्यादींवर संबंधीत मालकाच्या परवानगी शिवाय व संबंधीत प्राधिकरणाची परवानगी शिवाय वापर करण्यावर निर्बंध .तसेच निवडणूक कालावधित जात भाषा ,धर्मावर शिबीरांचे आयोजन करण्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत.प्रचारासाठी वापरण्यात येणाऱ्या वाहनांवर पक्ष प्रचाराचे फलक, झेंडे, इ. साठी खालील निर्बंध आहेत.

सक्षम प्राधिकाऱ्याच्या परवानगीशिवाय  कोणत्याहि व्यक्तीने वाहनावर कोणताही ध्वज/बॅनर किंवा मोठया आकाराचे स्टिकर्स लावू नये.

फिरत्या वाहनावर पक्ष प्रचाराचा झेंडा डाव्या बाजुला विंड स्क्रिन ग्लासच्या पुढे राहणार नाही व तो टपाच्या 2 फुट उंची पेक्षा जास्त नसावा.

प्रचार वाहानावर कापडी फलक वाहन चालकाच्या मागे डाव्या व उजव्या बाजुने लावण्यात यावा. इतर कोणत्याही बाजूस लाऊ नये.

वाहनावर लावण्यात येणारा पक्ष प्रचाराचा झेंडा किंवा कापडी फलक संबंधीत पक्षाचे जिल्हाध्यक्ष उमेदवार व उमेदवाराचे निवडणूक प्रचारासाठी निवडणूक निर्णयअधिकारी यांचे कडून  अधिकृत परवानगी घेतलेल्या वाहनावरच लावणे बंधनकारक आहे.

 हा आदेश सोलापूर जिल्ह्यासाठी आदेश निर्गमीत झाल्याच्या तारखे पासून दिनांक 25 नोव्हेंबर 2024 पर्यंत अंमलात राहतील. सदर आदेशाचे उल्लंघन केल्यास लोकप्रतिनिधीत्व अधिनियम 1951 मधील तरतुदीनुसार व भारतीय न्याय संहिता 2023 कलम 223 प्रमाणे दंडनीय कार्यवाहीस पात्र राहतील. असे आदेश जिल्हादंडाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिले आहेत.

HTML img Tag Simply Easy Learning    

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!