महाराष्ट्र

विधानसभा मतदारसंघ निहाय नियुक्त केलेल्या खर्च सनियंत्रण पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न

भारत निवडणूक आयोगाकडून दिनांक 15 ऑक्टोबर 2024 पासून महाराष्ट्र राज्य विधानसभा सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम घोषित करण्यात आला आहे.
      भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे जिल्हास्तरीय निवडणूक खर्च संनियंत्रण व व्यवस्थापन समिती स्थापन करण्यात आली आहे.  सार्वत्रिक विधानसभा निवडणूक 2024 च्या अनुषंगाने जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या सूचनेप्रमाणे निवडणूक खर्च संनियंत्रण कक्षामार्फत आज 11 विधानसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी आणि मतदार संघ निहाय नियुक्त केलेल्या विविध पथकातील अधिकारी व कर्मचारी यांचे गुगल मीट द्वारे सकाळ व दुपार अशा दोन सत्रात प्रशिक्षण कार्यशाळा घेण्यात आली.
यामध्ये निवडणूक घेण्याबाबतचे नियम 1961 मध्ये असलेल्या निवडणूक विषयक खर्चाच्या हिशोबात दिवसागणिक होणाऱ्या खर्चाच्या प्रत्येक बाबी संदर्भात तपशील देणे, उमेदवार कडून करण्यात आलेल्या दैनंदिन हिशोबाचे निरीक्षण व खर्चासाठी देण्यात आलेल्या परवानगींचे प्रती तपासणी, उमेदवाराने विहित केलेल्या मर्यादेपेक्षा अधिक प्रमाणात केलेल्या खर्चावर नियंत्रण ठेवणे. लेखा पथकाने राजकीय पक्षाच्या खर्चाचे सह नियंत्रण करण्यासाठी नियुक्त केलेले व्हिडिओ पाहणारे पथक, माध्यम प्रमाणन व संनियंत्रण समिती, स्थिर सनियंत्रण पथक व भरारी पथके आणि तक्रार संनियंत्रण कक्ष यांच्याकडून दैनंदिन रित्या विवरणपत्र सी वन नमुन्यात अहवाल प्राप्त करून घेणे. व्हिडिओ संरक्षण पथकाने उमेदवारांच्या निवडणूक विषयक खर्च सह नियंत्रणाची व्हिडिओ शूटिंग करताना घ्यावयाची दक्षता, व्हिडिओ पाहणारी पथकाने काळजीपूर्वक संपुर्ण व्हिडिओचे अवलोकन कसे करावे, भरारी पथके व स्थिर संरक्षण पथकांनी निवडणूक काळात होणाऱ्या बेकायदेशीर पैशाचे व्यवहार किंवा दारूचे कोणतेही वाटप किंवा मतदारांना देण्यासाठी वापरले जाण्याचा संशय असलेल्या कोणत्याही अन्य बाबी यांचा शोध घेणे, निवडणूक खर्च सनियंत्रण व व्यवस्थापना संबंधित दिलेली जबाबदारी आणि पथकांनी करावयाचे कारवाईबाबत पीपीटी द्वारे सविस्तर माहिती जिल्हास्तरीय खर्च व नियंत्रण समितीचे नोडल अधिकारी मनीषा वाकडे व चंद्रकांत पाटील यांच्या कडून देण्यात आली.
यावेळी पहिल्या सत्रामध्ये शहर उत्तर, दक्षिण सोलापूर, शहर मध्य, अक्कलकोट, मोहोळ व माढा विधानसभा मतदार संघ आणि दुसऱ्या सत्रामध्ये मंगळवेढा-पंढरपूर, सांगोला, करमाळा, बार्शी आणि  माळशिरस या मतदारसंघात नियुक्त केलेले लेखा पथक, व्हिडिओ सर्वेक्षण पथक, व्हिडिओ पाहणी पथक, फिरते पथक, स्थिर सर्वेक्षण पथक आणि खर्च सनियंत्रण कक्ष या पथकातील नियुक्त अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button