एखतपुर येथील मातंग समाजातील कार्यकर्त्यांचा व ग्रामपंचायत सदस्यांचा दिपकआबांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश

जिल्ह्याचे नेते, माजी आमदार दीपकआबा साळुंखे पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून एखतपुर येथील मातंग समाजातील कार्यकर्त्यांनी तसेच विद्यमान ग्रामपंचायत सदस्य पांडुरंग पवार, दीपक घारगे यांनी दीपकआबांच्या उपस्थितीत शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला. यावेळी दीपकआबांनी प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांचे स्वागत करून त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणार असल्याचे सांगितले.
तळागाळातील लोकांच्या हिताची तळमळ, समाजसेवेची आवड, कमालीची निर्भीडता, शासनव्यवस्थेला प्रश्न विचारण्याची हिंमत, लढण्याची उर्मी, कष्टकरी, श्रमिक, दीन-दुबळे, दलित, शेतकरी या सगळयांचे प्रश्न हेच दीपकआबा साळुंखे पाटील यांच्या राजकारणाचे केंद्रबिंदू राहिले आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षात प्रवेश केल्यानंतर सांगोल्यात सांगोल्यात पक्षप्रवेशाची लाट निर्माण झाली आहे.
दररोज कार्यकर्त्यांचे पक्ष प्रवेश होत असल्याने तालुक्यात शिवसेनेची ताकद मोठ्या प्रमाणात वाढली आहे. सांगोला तालुक्यातील एखतपुर येथील मातंग समाजातील सोमनाय फाळके, संजय फाळके, महादेव फाळके, रोहित फाळके, करण वाघमारे, धोंडीराम फाळके, नागेश फाळके अनिल फाळके, सुरज उबाळे, राज फाळके, कोहिनुर फाळके, लक्ष्मण फाळके, सोमनाथ कांबळे, सुनिल फाळके, दिपक फाळके, सुरज फाळके, शंकर फाळके, राम फाळके, राहुल उबाळे, राहुल फाळके, कुलदिप लोखंडे, जयदेव फाळके, सागर फाळके, तेजस तोरणे , ग्रामपंचायत सदस्य पांडुरंग पवार दीपक घारगे या कार्यकर्त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षात प्रवेश केला. यावेळी सरपंच विकास जाधव
ग्रामपंचायत सदस्य दादासाहेब इंगोले, युवा नेते नवनाथ इंगोले ,सोमनाथ चव्हाण , ज्ञानेश्वर जाधव हे उपस्थित होते.