महाराष्ट्र
सांगोला विद्यामंदिरचा कबड्डी संघ महाराष्ट्र राज्य उपविजेता

सांगोला ( प्रतिनिधी) सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळ सांगोला संचलित सांगोला विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेज, सांगोला कबड्डी संघ राजगुरू ह.मं.पंडित विद्यालय सफाळे जिल्हा पालघर या ठिकाणी झालेल्या १४ वर्षे वयोगट मुले राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेमध्ये उपविजेता ठरला असून कबड्डी खेळामध्ये दैदिप्यमान यश मिळविले आहे.यामध्ये सांगोला विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेजमधील १४ वर्षे वयोगट मुले(पुणे विभाग) या संघाने नागपूर विभाग, मुंबई विभाग या दोन्ही संघांचा पराभव केला. व अंतिम सामन्यात पुणे विभागतून सांगोला विद्यामंदिरने द्वितीय क्रमांक मिळविला.
सदर संघातील खेळाडू -अथर्व सूर्यवंशी,पियुष खळसोडे,अमित कांबळे, शुभम हाके,शुभम ताटे,श्रेयस पाटील,साई बिले,आर्यन देशमुख, ओम सांगोलकर योगेश नवले, ओम इंगोले,उमेश हजारे या खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी केली.
या यशस्वी खेळाडू व मार्गदर्शक शिक्षकांचा संस्थाध्यक्ष प्रा.प्रबुद्धचंद्र झपके यांचे हस्ते सत्कार करण्यात आला.यावेळी सांगोला विद्यामंदिर प्राचार्य अमोल गायकवाड, उपमुख्याध्यापिका शहिदा सय्यद उपप्राचार्य प्रकाश म्हमाणे व क्रीडाशिक्षक उपस्थित होते.
सर्व यशस्वी खेळाडूंना क्रीडा विभाग प्रमुख ज्युनिअर कॉलेज प्रा.डी.के पाटील,नरेंद्र होनराव सर,प्रा.संतोष लवटे,सुभाष निंबाळकर, स्नेहल देशमुख यांचे मार्गदर्शन लाभले.
वरील यशस्वी खेळाडू व मार्गदर्शक शिक्षकांचे सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव मल्लिकार्जुन घोंगडे, खजिनदार शंकरराव सावंत, सहसचिव प्रशुद्धचंद्र झपके,संस्था सदस्य विश्वेश झपके पर्यवेक्षक – सुरेश मस्तुद,प्रदीप धुकटे,मच्छिंद्र इंगोले,सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.
सांगोला विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेजमधील अथर्व बालाजी सूर्यवंशी, पियुष तुकाराम खळसोडे व अमित महादेव कांबळे या खेळाडूंची १४ वर्षे वयोगट मुले या संघामध्ये शालेय राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड झाली आहे.



