महाराष्ट्र

मुस्लिम समाजाकडून दीपकआबा साळुंखे पाटील यांचा सत्कार

जिल्ह्याचे नेते माजी आमदार दीपकआबा साळुंखे पाटील यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला. त्यानंतर दीपकआबा साळुंखे पाटील हे सांगोल्यात आल्यानंतर संपर्क कार्यालयात मुस्लिम समाजाकडून दीपकआबा साळुंखे पाटील यांचा सत्कार करण्यात आला. दिपकआबांना आमदार करण्यासाठी पायाला भिंगरी बांधून विधानसभा निवडणुकीत प्रचार करण्याचा विश्वास मुस्लिम समाजाकडून देण्यात आला.

दीपकआबा साळुंखे पाटील यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केल्यानंतर त्यांच्या समर्थकांमध्ये चैतन्याचे वातावरण निर्माण झाले असून पक्ष प्रवेश करणाऱ्या कार्यकर्त्यांची संख्या वाढली आहे. पक्ष प्रवेश केल्यानंतर दीपकआबा साळुंखे पाटील हे सांगोल्यात आल्यानंतर त्यांच्या संपर्क कार्यालयात मुस्लिम समाजाकडून दीपकआबांचा सत्कार करण्यात आला. विधानसभेच्या निवडणुकीत पायाला भिंगरी बांधून घराघरात विजयाची मशाल पोहोचवणार असून दीपकआबांना विक्रमी मताधिक्य देण्यासाठी जीवाचे रान करण्याचा निर्धार मुस्लिम समाजाच्या कार्यकर्त्यांनी दीपकआबांजवळ व्यक्त केला.

यावेळी रियाजभाई मुजावर, पोपट खाटीक, माजी नगरसेवक जुबेरभाई मुजावर, मोहसीन मणेरी, बाकीर मुलाणी सर, फिरोज मुलाणी, महंमदगौस मुजावर सर, नूर मणेरी, मिनाज मुलाणी, खलील शेख यांच्यासह मुस्लिम समाजाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia

gem visa