महाराष्ट्र
नंदेश्वर येथील सागर पाटील यांना वकिलाची सनद
मंगळवेढा तालुक्यातील नंदेश्वर येथील सागर शंकर पाटील यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिलची वकिलाची सनद मिळवल्याबददल त्यांचा सत्कार श्री बाळकृष्ण विद्यालय व ज्यु.कॉलेजच्या वतीने नुकताच करण्यात आला.
यावेळी सागर पाटील यांच्या हस्ते तायक्वांदो स्पर्धेत यश मिळवलेल्या विद्यार्थी व विद्यार्थिनींचाही सत्कार गुलाब पुष्प देऊन करण्यात आला.
पाटील यांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नंदेश्वर,माध्यमिक शिक्षण श्री बाळकृष्ण विद्यालय,उच्च माध्यमिक व पदवीचे शिक्षण श्री संत दामाजी महाविद्यालय मंगळवेढा येथे तर एलएलबीचे शिक्षण शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथे प्रथम श्रेणीमध्ये झालेले आहे.
याबद्दल त्यांचे श्री बाळकृष्ण विद्यालय व ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य विठ्ठल एकमल्ली, जनकल्याण सहकारी बँकेचे माजी संचालक पांडुरंग पाटील, सहशिक्षक ज्ञानेश्वर नरूटे,मनोहर बंडगर,पवन पाडवी,महादेव मोटे,नानासाहेब मेटकरी, गिरजाप्पा चौगुले,किरण नागणे, तुकाराम रोमन,दत्तात्रय माने, कृष्णदेव हेंबाडे,वैभव लाड, नवनाथ मेटकरी,मोहन कांबळे, प्रवीण डांगे,काशिनाथ थोरबोले, श्रीधर लाड,वसीम तांबोळी सहशिक्षिका माधुरी पवार,लक्ष्मी गरंडे,भगवान गरंडे,अनिल मदने यांच्यासह विद्यार्थी व ग्रामस्थांनी अभिनंदन केले.