सांगोला
खारवटवाडी येथील सिद्धेश्वर केदार यांचे दुःखद निधन —-
*खारवटवाडी तालुका सांगोला येथील सुरवसे-केदार परिवाराचे ज्येष्ठ सदस्य श्री सिद्धेश्वर ज्ञानोबा केदार यांचे 21 ऑक्टोबर 2024 (सोमवार ) रोजी सायंकाळी 8.00 वाजताचे सुमारास दुःखद निधन झाले आहे .मृत्यूसमयी त्यांचे वय 82वर्षे होते.
त्यांच्या पश्चात पत्नी, दोन विवाहित मुले ,दोन विवाहित मुली व नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांच्या तिसऱ्या दिवसाचा विधी बुधवारी सकाळी 7.30 वाजता सांगोला येथील स्मशानभूमीमध्ये होणार असल्याचे त्यांच्या नातेवाईकांनी सांगितले.अनिल केदार व कल्याण केदार यांचे ते वडील होते.ते स्वभावाने अत्यंत मनमिळाऊ होते. त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.