कमलापूर येथील होलार समाज बांधवांचा दीपकआबांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश
माजी आमदार दीपकआबा साळुंखे पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून सांगोला तालुक्यातील कमलापूर येथील होलार समाज बांधवांनी दीपकआबांच्या उपस्थितीत शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला. यावेळी दीपकआबांनी पक्षात प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांचे स्वागत करून त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणार असल्याची ग्वाही दिली. यावेळी प्रवेश केलेला कार्यकर्त्यांनी दीपकआबा साळुंखे पाटील यांना विधानसभेच्या निवडणुकीत विक्रमी मताधिक्याने विजयी करण्याचा निर्धार केला.
कार्यकुशल आणि धडाडीने निर्णय घेणारे नेते मा. आम. दीपकआबा साळुंखे पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून सांगोला तालुक्यातील कमलापूर येथील होलार समाज बांधवांसह शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला. दीपकआबा साळुंखे पाटील यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केल्यानंतर पक्षात नव्याने येणाऱ्या कार्यकर्त्यांचा मोठ्या प्रमाणात ओघ वाढला असून शेकडो कार्यकर्त्यांमुळे पक्षाला बळकटी मिळाल्याचे मत दीपकआबांनी व्यक्त केले. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात सांगोला तालुक्यातील कमलापूर येथील प्रवेश केलेल्या होलार समाज बांधवांचे पक्षात स्वागत आहे. होलार समाज बांधवांच्या अडचणी आणि प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्नशील असल्याची ग्वाही दीपकआबा साळुंखे पाटील यांनी दिली.
कमलापूरचे ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब तोरणे, शरद ऐवळे, शिवशंभो प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रमोद ऐवळे, दादा तोरणे, लिंगा तोरणे, अक्षय ऐवळे, गणेश ऐवळे, व्यंकटेश हणमंत ऐवळे, शुभम ऐवळे, अनिल गेजगे, बिरुदेव जावीर, रोहित गेजगे, नितीन ऐवळे, किरण ऐवळे, महादेव ऐवळे, अतुल गेजगे, किरण विलास ऐवळे, अजित अशोक ऐवळे, सचिन ऐवळे, दिनेश भडंगे, दीपक सदाशिव ऐवळे, लखन भडंगे, तेजस ऐवळे, समाधान ऐवळे, स्वप्नील ऐवळे पेंटर या होलार समाज बांधवांनी दीपकआबा साळुंखे पाटील यांच्या उपस्थितीत शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला. याप्रसंगी जेष्ठ नेते तानाजीकाका पाटील, डॉ.पियूष साळुंखे पाटील, हातीदचे सरपंच शहाजी हातेकर, माजी नगरसेवक सचिन लोखंडे, पिंटू म्हमाणे, भारतनाना गवळी, शिवाजीराव जावीर, सिताराम ऐवळे, आशिष भडंगे, सुशांत ऐवळे, रवी चौगुले यांच्यासह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.