महाराष्ट्र

हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत दिपकआबा साळुंखे पाटील यांच्या निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ

 

सांगोला: तालुका प्रतिनिधी

गेल्या पंचवीस वर्षाच्या राजकारणात माजी आमदार दीपकआबा साळुंखे पाटील यांनी कोणताही भेदभाव न करता जनतेच्या अडीअडचणी सोडवण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला आहे दीपक आबा साळुंखे पाटील यांचे तालुक्याच्या विकास कामात मोलाचे योगदान आहे. दीपकआबांचा प्रशासनात कामकरण्याचा दांडगा अनुभव आहे. त्यामुळे शासनाच्या सर्व योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून तालुका राज्यात आदर्श बनवण्यासाठी तसेच महाविकास आघाडीचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा पहिला आमदार विजयी करण्याच्या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी दीपकआबा साळुंखे पाटील यांना विक्रमी मताधिक्याने विजयी करण्याचा निर्धार जवळा परिसरातील ग्रामस्थांनी केला.
महाविकास आघाडीचे सांगोला विधानसभेचे अधिकृत उमेदवार दिपकआबा साळुंखे पाटील यांच्या प्रचाराचा शुभारंभ हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत २१ ऑक्टोंबर रोजी जवळा ता.सांगोला येथील श्री क्षेत्र नारायणदेव मंदिरात नारळ फोडून करण्यात आला. यावेळी जवळा, बुंरंगेवाडी, आगलेवाडी, भोपसेवाडी, तरंगेवाडी येथील ग्रामस्थ प्रचंड संख्येने उपस्थित होते.
यावेळी उपस्थित ग्रामस्थांनी सांगितले की, शेतीच्या पाण्याचे योग्य नियोजन करण्यासाठी, तालुक्यात अद्ययावत एमआयडीसी आणण्यासाठी, सांगोला तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी यंदा महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार दीपकआबा साळुंखे पाटील यांना प्रचंड मतांनी विजयी करण्याचा सर्वांनी निर्धार केला आहे. सांगोला विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दीपकआबांना दिली आहे. सांगोला विधानसभा मतदारसंघाचा विकास कसा करावा याचे व्हिजन दीपकआबा साळुंखे पाटील यांच्याजवळ आहे. मतदारसंघात विकास कामांची मशाल कायमस्वरूपी तेवत ठेवण्यासाठी महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार दीपकआबा साळुंखे पाटील यांना विजयी करण्यासाठी शिवसेनेची मशाल घराघरात पोहोचण्यासाठी महाविकास आघाडीचे कार्यकर्ते जीवाची बाजी लावून काम करतील असे ग्रामस्थांनी सांगितले.
महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार दीपकआबा साळुंखे पाटील यांच्या प्रचाराच्या शुभारंभ प्रसंगी युवानेते यशराजे साळुंखे पाटील, जेष्ठ नेते अरुणभाऊ घुले, सुनीलआबा साळुंखे, आनंदा नायकुडे, आबा बुरंगे, सचिन बुरंगे, किसन बुरंगे, विक्रम बुरंगे, शिवाजी कोळेकर, शिवाजी गावडे सर, सुरेश गावडे, तानाजी आगलावे, हरीबा गावडे, राजाराम मोहिते, चंदू नरळे, चंद्रकांत देशमुख गुरुजी, मारुती आगलावे मेजर, वसंत आगलावे, पंडितकाका साळुंखे, राजू हागरे, हरीबा गवंड, कुमार नायकुडे, बबन साळुंखे, राजू गूजले, विजकुमार मासाळ, दत्ता बर्वे, बाबुराव इमडे, नीलकंठ आमले, सुरेश गवंड यांच्यासह जवळा परिसरातील महाविकास आघाडीचे हजारो कार्यकर्ते उपस्थित होते.

 

—–

भोपसेवाडीत शेकापला खिंडार, कार्यकर्त्यांचा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश

दीपकआबा साळुंखे पाटील यांनी मशाल हातात घेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला. यानंतर सांगोला तालुक्यातील दीपकआबा समर्थकांमध्ये चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यातच जवळा येथे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार दीपकआबा साळुंखे पाटील यांच्या प्रचाराच्या शुभारंभप्रसंगी शेतकरी कामगार पक्षातील भोपसेवाडी येथील अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला. शेकापमधील अनेक कार्यकर्ते शेकापला अखेरचा लाल सलाम करीत दीपकआबा साळुंखे पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश करीत असल्याने शेकापला खिंडार पडले आहे.

HTML img Tag Simply Easy Learning    

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!