विद्यमान लोकप्रतिनिधींच्या वजनदार कार्यकर्त्यांचा शेकाप मध्ये जाहीर प्रवेश
सांगोला: शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार डॉ.बाबासाहेब देशमुख व डॉक्टर अनिकेत देशमुख यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत शिवसेनेच्या विद्यमान नेतृत्वाला कंटाळून कट्टर शहाजीबापू समर्थकांचा डॉ.बाबासाहेब देशमुख यांच्या उपस्थितीत शेकाप मध्ये प्रवेश केला.विधानसभा निवडणुकीत डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांना कोणत्याही परिस्थितीत आमदार करायचे या ईर्षेने पेटलेल्या चिंचोली गावातील कट्टर शहाजीबापू गटाच्या समर्थकांनी पक्षाला रामराम करीत एकदिलाने शेकाप मध्ये प्रवेश केला
2014 व 2019 ला मा.शहाजीबापु पाटील यांच्या सोबत असलेले चिंचोली गावचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी शिवसेना शिंदे गटातुन शनिवार दि. 2 नोव्हेंबर रोजी डॉ.भाई बाबासाहेब देशमुख यांच्या उपस्थितीत शेतकरी कामगार पक्षात प्रवेश केला
प्रवेश करणाऱ्यांमध्ये हणमंत बेहरे (ग्रामपंचायत सदस्य) , बंडु पाटील,अनिल पाटील, कांतीलाल बेहरे, बंडु बेहरे, महादेव जावीर,धनाजी बेहरे,सुनिल बेहरे, शिवाजी बेहरे, ज्ञानेश्वर बेहरे, दत्तात्रय बेहेरे आदी प्रमुख पदाधिकाऱ्यांसह असंख्य कार्यकर्त्यांनी प्रवेश केला.यावेळी जेष्ठ नेते कोंडिबा सिद ,लक्ष्मण सिद, नामदेव कृष्णा वाघमोडे, रामचंद्र नागू हजारे,समाधान पाटील हे उपस्थित होते.
सांगोला तालुक्यातील चिंचोली येथील शिवसेना पक्षामधील अंतर्गत राजकारणाला कंटाळून निष्ठावंत कार्यकर्त्यांनी पक्षाला अखेरचा निरोप देत डॉक्टर बाबासाहेब देशमुख व डॉ. अनिकेत देशमुख यांच्या नेतृत्वाखाली काम करण्यासाठी शेकाप मध्ये प्रवेश केला.
आगामी निवडणुकीला ध्यानात ठेवून प्रस्थापित नेत्यांकडून समाजासमाजात भांडणं लावण्याचं काम मोठ्या प्रमाणात सुरू आहे हे सर्वसामान्य जनतेला दिसतंय. शेतकरी कामगार पक्षाकडून आजपर्यंत असे घाणेरडे राजकारण कधीच केले नाही. शेकाप विरोधी नेतृत्व जेव्हाही सांगोला तालुक्यात बनते, तेव्हा या नेतृत्वाकडून समाजात फूट पाडणे किंवा भांडणे लावणे हा प्रकार झाला आहे. सत्तेशिवाय ही लोक राहू शकत नाही. सांगोल्याची प्रतिमा मलिन करणे. जनतेत भ्रम निर्माण करणे हे काम सध्या मोठ्या प्रमाणात सुरू आहे.त्याच प्रमाणे सर्वसामान्य जनतेवर अन्याय वाढल्या मुळे तसेच सर्वसामान्य जनतेमधून शेतकरी कामगार पक्षाचे अधिकृत उमेदवार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांच्या बद्दल मोठी सहानुभूती दिसून येत असल्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत देखील शेतकरी कामगार पक्षाचा दणदणीत विजय होणार असल्यामुळे आम्ही शेतकरी कामगार पक्षात प्रवेश केला असल्याचे प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांकडून सांगण्यात आले