कोळे येथे बैलगाडी शर्यतिस रेकॉर्ड ब्रेक गर्दी ; हेलिकॉप्टर बैज्या,  हरण्या बैलजोडीने एक लाखाचे बक्षीस पटकावलं

स्वर्गीय आमदार भाई गणपतरावजी देशमुख यांच्या जयंतीनिमित्त व स्वातंत्र्यदिनानिमित्त भव्य बैलगाडी शर्यतीचे आयोजन  कोळे तालुका सांगोला येथे करण्यात आले होते.या बैलगाडीच्या शर्यतीमध्ये बाळू हजारे शिरूर यांचा हेलिकॉप्टर बैज्या  संदीप पाटील कोल्हापूर यांचा हारण्या या बैल जोडीने एक लाखाचं प्रथम क्रमांक बक्षीस जिंकलं व द्वितीय क्रमांकाचं बक्षीस उमेश जाधव पळशी यांचा फाकड्या व उमेश कोळेकर आरेवाडी यांचा गुलब्या या बैल जोडीने द्वितीय क्रमांक पटकावले बंडा हसबे हिवरे यांचा बैजा व विठ्ठल खरात घेरडी यांचा हारण्या या बैल जोडण्यात तृतीय क्रमांक पटकावले.

 

या कार्यक्रमाचे आयोजन कोळे जिल्हा परिषद गटाचे जिल्हा परिषदेचे माजी जिल्हा परिषद सदस्य एडवोकेट सचिन देशमुख, बैल गाडी प्रेमी कोळे व कै.  अशोकराव देशमुख युवा कला क्रीडा मंच यांनी केले होते. कार्यक्रमाचे उद्घाटक प्रशांत परिचारक माजी आमदार विधान परिषद बी आर एस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव कदम ,भगीरथ भालके, बाबुराव गायकवाड, बाबा करांडे, विलासराव देशमुख, तानाजी वाघमोडे, बाळासाहेब काटकर, सोमा भाऊ मोटे, खंडू सातपुते, संतोष देवकाते, हनुमंत कळवले, नारायण जगताप, सिताराम सरगर, नारायण पाटील, राजू देशमुख बाळासाहेब देशमुख, सरपंच राजश्री सरगर उपसरपंच सादिक पटेल सर्व ग्रामपंचायत सदस्य यावेळी उपस्थित होते,

कार्यक्रमाप्रसंगी बोलताना प्रशांत जी परिचारक  म्हणाले की बैलगाडी शर्यत कायदेशीर मार्गातून बाहेर पडली असून यामुळे ग्रामीण अर्थकारण बदलले आहे खिलार जनावर बघायला सुद्धा भेटत नव्हते अशी अवस्था गेल्या दहा वर्षात झाली होती पुन्हा एकदा बैलगाडी शर्यतीला परवानगी मिळाल्यामुळे ग्रामीण भागातील बैलप्रेमी यांना नव संजीवनी मिळाले आहे

ॲड सचिन देशमुख यांनी प्रास्ताविक करताना म्हणाले या भागामध्ये बैलगाडी प्रेमींची संख्या खूप आहे तो अशा प्रकारचे मैदान भरवण्याचे नियोजन या लोकांच्या प्रेमा आग्रहाने मला करावे वाटले या भागात खूप मोठ्या प्रमाणात बैलगाडा शर्यतीचे शौकीन प्रेमी आहेत परंतु अशा प्रकारचे मैदान या भागात होत नव्हते आणि बैलगाडी खिलार जनावर यांना नव संजीवनी देण्याच्या हेतूनेच व ग्रामीण अर्थकारण बदलण्याच्या हेतूनेच अशा प्रकारचे स्पर्धेचे आयोजन केले आहे

यावेळी या स्पर्धेसाठी कोल्हापूर, सोलापूर, सातारा, सांगली, पुणे, कर्नाटक त्या भागातून बैलगाडीवर प्रेम करणारे प्रेक्षक मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित झाले होते. एक लाखापेक्षा जास्त लोक या ठिकाणी उपस्थित होते. हा थरार अगदी चित्रपटातील सीन प्रमाणे शोभेल असा झाला . ही शर्यत पार पाडण्यासाठी कै.अशोकराव देशमुख कला व क्रीडा मंच कोळे  या मंडळाचे कार्यकर्ते व बैलप्रेमी कोळे परिश्रम घेतले

 

एक लाख रुपये च्या बक्षिसाच्यासाठी हेलिकॉप्टर बैज्या व हरण्या फकड्या व गुलब्या या बैलजोडीतला थरार पाहण्यासारखा झाला, एका क्षणाच्या अंतरावरती हे बैल जोडी मागे राहिल्याने द्वितीय क्रमांक मिळाला अशा प्रकारचे मैदान दरवर्षी या भागात भरावे अशी इथे जमलेल्या बैलगाडी प्रेमींची अपेक्षा होती,

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button