महाराष्ट्र

फॅबटेक मध्ये अभियांञिकी पदव्युत्तर-पदवी अभ्यासक्रमास मान्यता

नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार फॅबटेक टेक्निकल कॅम्पस कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च महाविद्यालयात चालू शैक्षणिक वर्ष २०२५-२६ पासुन अभियांञिकी अभ्यासक्रम पदव्युत्तर-पदवी च्या अभ्यासक्रमाला अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद, नवी दिल्ली यांनी दिलेल्या मान्यतेस अनुसरून, संचालक, तंञ शिक्षण यांनी संदर्भाधिन पञान्वये, तंत्रशिक्षण संचालनालयाच्या अधिपत्याखालील फॅबटेक कॉलेज मध्ये अभियांञिकी शाखेच्या पदव्युत्तर-पदवी नवीन अभ्यासक्रमास शासनाने नुकतीच मान्यता दिली असल्याची माहिती फॅबटेक एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष भाऊसाहेब रूपनर यांनी दिली.

      फॅबटेक टेक्निकल कॅम्पस कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च महाविद्यालयाला शैक्षणिक वर्ष २०२५-२०३५ यावर्षासाठी स्वायत्त (ऑटोनॉमस) दर्जा प्राप्त झाला असुन स्वायत्ततेमुळे महाविद्यालय स्वतःचा अभ्यासक्रम तयार करणे, परीक्षा पद्धत निश्चित करणे आणि मूल्यमापनाचे निकष निश्चित करण्याचे अधिकार महाविद्यालयास प्राप्त झाले आहेत. महाविद्यालयात इंडस्ट्रील ओरियंटेड अभ्यासक्रमाची रचना केली असून इंडस्ट्रीलमध्ये आवश्यक असलेले ज्ञान या माध्यमातून विद्यार्थ्यांना मिळणार आहे. त्यामुळे फॅबटेक कॉलेज मध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीनुसार अभ्यासक्रम निवडण्याची आणि आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित शिक्षण घेण्याची संधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाली आहे. अभियांत्रिकीचा चार वर्षांचा पदवी अभ्यासक्रम पुर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना अभियांञिकीचे पदव्युत्तर-पदवीचे शिक्षण फॅबटेक टेक्निकल कॅम्पस कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च, सांगोला महाविद्यालयात घेता येणार आहे. कुशल मनुष्यबळ/अभियंते घडविण्यासाठी सांगोला फॅबटेक कॉलेजने पुढाकार घेतला असून येत्या शैक्षणिक वर्षांपासून अभियांञिकी पदव्युत्तर-पदवी अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे

  शैक्षणिक वर्ष २०२५-२६ पासुन फॅबटेक इंजिनिअरिंग महाविद्यालयात पदव्युत्तर-पदवी अभ्यासक्रमास नुकतीच उच्च व तंत्रशिक्षण विभाग महाराष्ट्र शासनाने मान्यता दिली आहे. यापुर्वी फॅबटेक इंजिनिअरिंग कॉलेज मध्ये मेकॅनिकल इंजिनिअरिंग व इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग यांना मान्यता होती. चालू शैक्षणिक वर्षांपासून कॉम्पुटर सायन्स अ‍ॅण्ड इंजिनिअरिंग,जीओ टेक्निकल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅण्ड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग या अभ्यासक्रमाला शासनाकडून मान्यता मिळाली आहे.

 अभियांञिकीच्या पदव्युत्तर-पदवी अभ्यासक्रम नव्याने मान्यता मिळाल्याने फॅबटेक टेक्निकल एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा श्रीमती नीलवर्णा बिरासाहेब रूपनर, उपाध्यक्ष भाऊसाहेब रूपनर, सचिव डॉ. अमित रूपनर, कार्यकारी संचालक दिनेश रूपनर, इस्टेट डायरेक्टर डॉ. संजय आदाटे, व्यवस्थापक प्रतिनिधी प्रा. प्राजक्ता रूपनर, प्राचार्य डॉ. रविंद्र शेडगे, उपप्राचार्या डॉ. विद्याराणी क्षीरसागर आदींसह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांमध्ये उत्साही वातावरण निर्माण झाले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button