धायटीत शेकाप कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

दीपकआबा साळुंखे पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून धायटी येथील शेकापच्या असंख्य कार्यकर्त्यांनी आज शिवसेनेच्या ठाकरे गटात प्रवेश केला आहे. शेकाप नेतृत्वाच्या मनमानी कारभाराला कंटाळून निष्ठावंत शेकाप कार्यकर्त्यांनी दीपक आबा साळुंखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली काम करण्यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेची मशाल हाती घेतली.
सांगोला तालुक्यातील धायटी येथील शेकाप मधील अंतर्गत राजकारणाला कंटाळून निष्ठावंत शेकाप कार्यकर्त्यांनी पक्षाला अखेरचा लाल सलाम करीत दीपकआबा साळुंखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली काम करण्यासाठी शिवसेनेचा भगवा खांद्यावर घेतला आहे.
यावेळी खंडू भोसले, राजेंद्र भोसले, धनराज पाटील उपस्थित होते. ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केल्याने कार्यकर्त्यात उत्साहाचे वातावरण आहे. विधानसभा निवडणुकीत दीपकआबा साळुंखे पाटील यांना धायटी गावातून विक्रमी मताधिक्य देण्याचा निर्धार शिवसेनेत प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.