महाराष्ट्र
रंगुबाई प्रभू घुले यांचे अल्पशा आजाराने निधन

पाचेगाव/प्रतिनिधी:
रंगुबाई प्रभू घुले यांचे शुक्रवार दि 25 रोजी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.त्याच्यावर पाचेगाव खुर्द येथील स्मशान भूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
त्या पाचेगाव खुर्द येथील प्रगतशील बागायतदार श्री निवृत्ती प्रभू घुले व पांडुरंग ऑटोमोबाईल सांगोला चे मालक पोपट प्रभू घुले यांच्या मातोश्री होत्या. त्यांच्या पश्चात मुले, मुली, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.
त्यांच्या तिसऱ्या दिवसाचा विधी रविवार दि 27 रोजी सकाळी 7:30 वाजता पाचेगाव खुर्द येथील स्मशान भूमीत होणार असल्याचे त्यांच्या नातेवाईकांनी सांगितले.