सांगोला विद्यामंदिरमुळेच शिक्षणाचा पाया भक्कम – शास्त्रज्ञ डॉ.वैशाली मोटे; करिअर गाईडन्स व्याख्यानामध्ये प्रतिपादन

सांगोला (प्रतिनिधी) शाळा आपल्या व्यक्तिमत्त्व विकासाची पहिली पायरी आहे.याच ठिकाणी नवनवीन गोष्टी शिकवल्या जातात, मुलांना नवे काहीतरी शिकण्याची संधी मिळते.त्याचबरोबर  स्वतःला सिद्ध करण्याची संधी मिळते.तसेच ध्येयनिश्चती होती.आज मी मूलभूत विज्ञानातील संशोधन आणि अध्यापनासाठी समर्पित असलेल्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च (IISER) पुणे येथे वरिष्ठ शास्त्रज्ञ म्हणून कार्यरत आहे.या शैक्षणिक प्रवासाठी सांगोला विद्यामंदिरनेच माझा शैक्षणिक पाया भक्कम केला असे प्रतिपादन सांगोला विद्यामंदिर प्रशालेच्या माजी विद्यार्थिनी वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. वैशाली मोटे यांनी केले.
सांगोला विद्यामंदिर ज्युनिअर कॉलेज करियर गाईडन्स विभाग अंतर्गत व्याख्यानामध्ये  मार्गदर्शन  करताना बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळ सांगोला अध्यक्ष प्रा. प्रबुद्धचंद्र झपके, खुर्शीद काझी , संस्था कार्यकारणी सदस्य विश्वेश झपके, प्राचार्य गंगाधर घोंगडे, उपप्राचार्य शाहिदा सय्यद उपस्थित होते.
पुढे बोलताना डॉ.मोटे म्हणाल्या पारंपारिक क्षेत्रापेक्षा नवनवीन क्षेत्र निवडणे व त्यामध्ये करिअर करणे   काळाची गरज आहे.त्याचबरोबर वैज्ञानिक व इतर  संशोधनामध्ये विद्यार्थ्यांनी  योगदान दिले पाहिजे.त्यासाठी भारतामधील पुणे व इतर ठिकाणी नामवंत इन्स्टिट्यूट आहेत.यामधील प्रवेश परीक्षेला सामोरे गेले पाहिजे असे सांगितले. उपस्थित विद्यार्थ्यांशी प्रश्न  व उत्तरे असा संवाद साधत  विविध शाखा त्यासंदर्भातील  विद्यार्थ्यांच्या शंकाचे  निरसन करत मौलिक माहिती दिली.व या संधीतून यशप्राप्तीसाठी स्वंयअध्ययन , कठोर  परिश्रम , आंतरराष्ट्रीय भाषेचे अध्ययन असे उपायही सुचविले.
या कार्यक्रमासाठी सांगोला विद्यामंदिर ज्युनिअर कॉलेज मधील  विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य गंगाधर घोंगडे यांनी केले.प्रा.अश्विनी जालगिरे यांनी प्रमुख पाहुण्यांची ओळख करून दिली.सूत्रसंचालन प्रा.अर्चना कटरे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. गणेश घेरडीकर  यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button