दोन दिवसात स्वच्छता मोहिम न राबविल्यास नगरपरिषदेसमोर आणून टाकणार कचरा – मा.नगरसेवक माऊली तेली
सांगोला शहरात वाढू लागले डेंग्यू व मलेरियाचे रुग्ण

सांगोला(प्रतिनिधी):- सांगोला शहरात सध्या डेंग्यू व मलेरियाचे रुग्ण वाढत चालले आहेत. यामध्ये लहान मुलांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. शहर व परिसराला घाणीने वेढले असून नगरपालिकेने तात्काळ सर्व भागात स्वच्छता मोहिम राबवून औषध फवारणी करावी. दोन दिवसात स्वच्छता मोहिम न राबविल्यास नगरपरिषदेसमोर कचरा आणून टाकून अनोखे आंदोलन करणार असल्याचा इशारा माजी नगरसेवक ज्ञानेश्वर माऊली तेली यांनी दिला आहे.
सांगोला शहरामध्ये मागील काही दिवसेंदिवस पावसाने हजेरी लावल्यामुळे शहरातील लोहार गल्ली येथील तेली गल्लीतून रेल्वे गेट कडे जाणार्या रस्त्याच्या बाजूला आरक्षित बगीचा जागेवर मोठ्या प्रमाणात गवत उगवल्याने रोडवरती व रोडच्या कडेला ही गवत उगविल्याने तसेच गटारी मध्ये पाण्याचा साठा होत असल्याने डासांचे साम्राज्य वाढताना दिसत आहे. नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. नगरपालिकेने वाढलेले गवत काढून औषध फवारणी करून घ्यावी अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन केले जाईल असा इशारा माजी नगरसेवक ज्ञानेश्वर माऊली तेली यांनी दिला आहे.
त्याचप्रमाणे सांगोला शहरात अनेक भागात मोठ्या प्रमाणात गवतांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. शहरामध्ये घराच्या कडेने तसेच गटारी मध्ये पाणी साठून राहिल्याने त्याठिकाणी दुर्गंधी निर्माण झालेली आहे. त्यावरती डासांचा वावर वाढलेला आहे.
काही ठिकाणी गवत वाढल्या कारणाने या परिसरामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर डास वाढत आहेत. आधीच ताप व सर्दी ची साथ सुरू असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वार्तावारण पसरले आहे. डेंग्यू मलेरिया सारखे आजार उद्भवत आहेत. या भीतीमुळे नागरिक घरामध्ये बसून आहेत. त्यामुळे आधीपासूनच नागरिकांचे आरोग्य धोक्यात मध्ये आहे. त्यात आणखीन भर म्हणून पावसाने शहरामध्ये सर्वत्र गवत उगवले असल्याने यावर डासांचे साम्राज्य वाढत आहे. याचा त्रास नागरिकांना मोठ्या प्रमाणावर सहन करावा लागत आहे.
त्यामुळे डासा पासून होणारा नागरिकांचा त्रास वाचवण्यासाठी सांगोला नगरपालिकेच्या आरोग्य विभागाने शहर व परिसरातील सर्व भागातील गवत तातडीने काढून गटारी साफ करून औषध फवारणी करणे आवश्यक आहे. अन्यथा नजीकच्या कालावधीत नागरिकांना घेऊन नगरपरिषदेसमोर कचरा आणून टाकून अनोखे आंदोलन करणार असल्याचा इशारा माजी नगरसेवक ज्ञानेश्वर माऊली तेली यांनी दिला आहे.