253 सांगोला विधानसभा साठी मतदान केंद्रावरील केंद्राध्यक्ष व सहाय्यक केंद्र अध्यक्ष यांचे प्रशिक्षण दिनांक 27/ 10 /24 रोजी निवडणूक निर्णय अधिकारी भैराप्पा माळी व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी संतोष कणसे तथा तहसीलदार व डॉक्टर सुधीर गवळी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांचे उपस्थित दोन सत्रात घेण्यात आले आहे

प्रथम सत्र साडेदहा ते दीड वाजेपर्यंत पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर स्मृती भवन टाऊन हॉल व विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेज सांगोला या ठिकाणी घेण्यात आले. द्वितीय सत्र दोन वाजून 30 मिनिटे ते ५ वाजेपर्यंत वरील दोन्ही ठिकाणी घेण्यात आले आहे
यावेळी सर्व क्षेत्रीय अधिकारी म्हणजे झेड ओ आणि प्रशिक्षक म्हणून तलाठी यांनी व क्षेत्रीय अधिकारी यांनी हॅन्डसाॅन प्रशिक्षण दिले तसेच या वेळेस , नायब तहसीलदार सोमनाथ साळुंखे, नोडल अधिकारी हरिश्चंद्र जाधव तथा मंडलाधिकारी नाझरे हे उपस्थित होते या प्रशिक्षणासाठी दोन्ही सत्रामध्ये केंद्राध्यक्ष व सहाय्यक केंद्र अध्यक्ष 369 प्रशिक्षणार्थी उपस्थित असल्याचे मीडिया नोडल अधिकारी मिलिंद सावंत पंचायत समिती यांनी सांगितले
Back to top button