माढा लोकसभेचे खासदार धैर्यशील मोहिते –पाटील यांना रेल्वेच्या विविध मागण्यांचे निवेदन शहीद अशोक कामटे बहुउद्देशीय सामाजिक संघटनेच्यावतीने देण्यात आले.
या निवेदनात गाडी क्रमांक 11027&11028 दादर– सातारा– दादर रेल्वे आठवड्यातून तीन दिवस सुरू असून प्रवाशांच्या मागणीनुसार ती दररोज सुरू करावी, सकाळ सत्रात कोल्हापूर –कलबुर्गी–कोल्हापूर रेल्वे, सांगली– मिरज –सोलापूर एक्सप्रेस या रेल्वे सेवा सुरू कराव्यात , सांगोल्यातील आर यु बी 32 A च्या प्रलंबित समस्या सोडवाव्यात या आग्रही मागण्याचे निवेदन अशोक कामटे संघटनेच्या वतीने देण्यात आले .यावेळी आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख, बाबूराव गायकवाड, निलकंठ शिंदे सर,प्रा प्रसाद खडतरे, मकरंद पाटील, अनिल तारळकर यांच्यासह संघटनेचे सदस्य व पदाधिकारी उपस्थित होते.
चौकट:-
*दादर –सातारा –दादर दररोज करिता प्रशासन सकारात्मक *
कलबुर्गी– कोल्हापूर– कलबुर्गी, दादर– सातारा– दादर एक्सप्रेस दररोज सुरू करण्याकरता अशोक कामटे संघटनेने रेल्वे मंत्रालय यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा सुरू आहे, तसेच खासदार धैर्यशील मोहिते —पाटील यांनीही या प्रश्नाबाबत रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे मागणी करून पाठपुरावा सुरू असल्याचे सांगितले लवकरच रेल्वे बोर्डात याबाबत सकारात्मक निर्णय होईल असे आश्वासन अशोक कामटे संघटनेस यावेळी त्यांनी दिले
निलकंठ शिंदे, सर अध्यक्ष — शहीद अशोक कामटे बहुउद्देशीय सामाजिक संघटना सांगोला.