सांगोला तालुकामहाराष्ट्रशैक्षणिक

सांगोला महाविद्यालयात महिला तक्रार निवारण समितीच्या वतीने व्यक्तिमत्व विकास कार्यक्रम संपन्न

सांगोला / प्रतिनिधी: दिनांक 7 फेब्रुवारी 2024 रोजी सांगोला महाविद्यालयात महिला तक्रार निवारण
समिती व भारतीय स्त्री शक्तीचे मैत्रीण कुटुंब सल्ला केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने व्यक्तिमत्व्‍
विकासासाठी प्रबोधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

 

या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून नवोदित
कवियत्री सौ.जान्हवी सावंत व अध्यक्ष म्हणून सुविद्य वाचक मंच सांगोला येथील सौ. पुष्पलता मिसाळ या
उपस्थित होत्या. आपल्या मनोगतात प्रमुख पाहुण्या सौ.जान्हवी सावंत यांनी वसतिगृहातील मुलींना
आपल्या घरापासून दूर राहून घराशी असलेले आपले संबंध, नात्यांमधील प्रेम या गोष्टी कशा टिकवून ठेवता
येतात. हे स्वतःच्या होस्टेल जीवनातील अनुभवातून मुलींनी पटवून दिले. आपले कुटुंब आनंदी ठेवताना
प्रत्येक स्त्रीला सृजनाच काम करावं लागतं त्यासाठी तिचे व्यक्तीमत्व्‍ सदृढ, सक्षम असावे म्हणून तिला
स्वयंपाक ही कला आत्मसात केले पाहिजेत. हे त्यांच्या पाकलेल्या काही रेसिपी सांगून त्यांनी स्पष्ट केले.
वाचन हा छंद त्यांनी कसा जोपासला याविषयी त्यांनी आपल्या अनुभव सांगितले. “ घे भरारी ” या नुकत्याच
त्यांनी लिहिलेल्या कवितेतून मुलींना खूप प्रोत्साहन पर मार्गदर्शनही केले.

आपल्या अध्यक्षीय मनोगतात कवयित्री सौ. पुष्पलता मिसाळ यांनी आई मुलगा-मुलगी यामध्ये
कधीच फरक करत नाही. फक्त ती आपलं मूल मोठं व्हावं नाव कमवावं यासाठी अगदी लहानपणापासून
त्याची कोणत्या प्रकारची काळजी घेत असते. याविषयी आपल्या “माझी लेक” लाडाची यासारख्या कवितेतून
मुलींसमोर स्पष्ट केले आई-वडिलांचा म्हणूनच आपण सन्मान केला पाहिजे व त्यांना अभिमान वाटेल असे
कर्तृत्व्‍ प्रत्येक मुलीने केले पाहिजे. यासाठी प्रबोधन पर कथा मुलींना सांगितल्या. त्याचबरोबर आपले
अनुभव ही त्यांनी सांगितले वाचन हा आपल्या आयुष्यात किती महत्त्वाचा भाग आहे हे सांगताना त्यांनी
आपली मी पुस्तकाच्या प्रेमात पडले या कविता मुलींसमोर सादर केली. पुस्तका सोबतच माणसंही वाजता
आली पाहिजेत यावरही आपले विचार मांडले. मुलींनी डायरी लिहावी व त्यात स्वतःला घडवताना पुन्हा-पुन्हा
ती वाचावी कारण लेखन वाचनातून मनुष्य महानतेकडे जातो. याची अनेक उदाहरणे त्यांनी आपल्या
मनोगतातून सांगितले. सर्वात महत्त्वाचे म्हणजे मुलगी ही आईला एक परिसस्पर्शाची जाणीव देणारी ठरली
पाहिजे. तरच कुटुंब व्यवस्था सुदृढ होईल यावर पोरी जरा जपून यासारखी स्वरचित कविता ही त्यांनी सादर
केली.

या कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्रा.डॉ. चित्रा जांभळे यांनी केले. सर्व उपस्थितांचे स्वागत मुलींच्या
वस्तीगृहाच्या रेक्टर सौ. सुरेखा सुरवसे यांनी केले आभार प्रदर्शन कु.किशोरी माने हिने केले तर सूत्रसंचालन
जागृती देशमुख हिने केले. सदर कार्यक्रमास 250 हून अधिक मुली उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या
यशस्वीतेसाठी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.सुरेश भोसले यांनी बहुमोल सहकार्य केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!