सांगोला: सांगोला विधानसभा मतदारसंघ निवडणुकीसाठी 32 उमेदवारांचे 40 अर्ज वैद्य
253 सांगोला विधानसभा मतदारसंघासाठी ची छाननी प्रक्रिया पूर्ण
सांगोला:- आज रोजी दिनांक 30 /10/ 24 रोजी सकाळी 11 वाजता निवडणूक निर्णय अधिकारी भैराप्पा माळी व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी संतोष कणसे यांच्या उपस्थितीत छाननी प्रक्रिया घेण्यात आली.
एकूण प्राप्त 37 उमेदवारांनी 48 अर्ज भरलेले होते त्यापैकी 32 उमेदवारांची 40 अर्ज वैद्य ठरवण्यात आले आहेत तसेच पाच उमेदवारांचे अर्ज पूर्णतः अवैध ठरवण्यात आलेले आहेत तसेच तीन उमेदवारांनी दोन अर्ज भरले होते त्यापैकी एक अर्ज अवैध ठरवण्यात आला आहे
अवैध ठरवण्यात आलेले उमेदवारांची नावे खालील प्रमाणे आहेत
1) रेखा शहाजी पाटील शिवसेना
2)कुंदन फुलचंद बनसोडे बसपा
3) तानाजी शिवाजी केदार अपक्ष
4) दिगंबर शंकर लवटे अपक्ष
5) तुकाराम केशव शेंडगे राष्ट्रीय समाज पक्ष हे अर्ज अवैध ठरवण्यात आले असल्याची माहिती मीडिया नोडल अधिकारी मिलिंद सावंत पंचायत समिती सांगोला यांनी सांगितले आहे