253 सांगोला विधानसभा मतदारसंघात माननीय श्री सुबोधकुमार भावे भा.प्र.से. तथा सर्वसाधारण निरीक्षक यांची सांगोला विधानसभा छाननी प्रक्रियेस भेट
आज दिनांक 30/10/24 रोजी सांगोला विधानसभा छाननी प्रक्रियेस माननीय श्री सुबोधकुमार भावे यांनी भेट देऊन छाननी प्रक्रियेची पाहणी करून वैद्य उमेदवारांची नावे जाणून घेतली तसेच अवैध उमेदवारांची कारणांची माहिती घेतली त्यानंतर त्यांनी प्रशिक्षण केंद्र, सुरक्षा कक्ष, ईव्हीएम ठेवण्यात आलेल्या ठिकाणची पाहणी केली तसेच मतमोजणी कक्षाची पाहणी करून समाधान व्यक्त केले
माननीय सर्वसाधारण निरीक्षक सुबोधकुमार भावे यांचे कडे 252 पंढरपूर 253 सांगोला 254 माळशिरस या तीन विधानसभा मतदारसंघासाठी त्यांची नेमणूक करण्यात आल्याचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी संतोष कणसे यांनी दिल्याचे मीडिया नोडल अधिकारी मिलिंद सावंत पंचायत समिती सांगोला यांनी दिली आहे
त्या वेळेस त्यांचे सोबत निवडणूक निर्णय अधिकारी,भैराप्पा माळी, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी संतोष कणसे व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी डॉक्टर सुधीर गवळी तसेच डॉक्टर गव्हाणे नोडल अधिकारी हे उपस्थित होते