महाराष्ट्र
शेतकरी महिला सहकारी वस्त्रनिर्माण सूत गिरणी मर्या, सांगोले कामगारांना ८.३३% बोनस वाटप
सदर महिला सूतगिरणी गेल्या काही दिवसांपासून बंद होती, अशातच सूतगिरणीची निवडणूक झाली, या निवडणूकीत स्वर्गिय डॉ. भाई गणपतरावजी देशमूख साहेब यांच्या विचारांच्या शेतकरी कामगार पक्षाचे सर्व पॅनल भरघोस मताने विजयी होवून फेब्रुवारी २०२४ पासून नविन संचालक मंडळाची स्थापना झाली.
नविन चेअरमन श्रीमती. कल्पनाताई शिगाडे व व्हा.चेअरमन सी. वंदनाताई बाबर आणि नविन संचालक मंडळास अनेक कायदेशिर बाबीचा सामना करावा लागला. त्यानंतर सूतगिरणी सूरू करण्यासाठी सर्वात मोठा प्रश्न भांडवलाचा होता. यावर गेले कित्येक महिने मार्ग काढण्याचा प्रयत्न चालू होता. या सर्व बाबीवर चेअरमन, व्हा. चेअरमन व संचालक मंडळाने कसोशीने मात केली. व या सर्वाच्या प्रयत्नास आज दि.२९.१०.२०२४ रोजी धनत्रयोदिशी या शूभ मुहूर्तावर यश आले. आणि जवळ जवळ वर्षभर बंद असणारी सूतगिरणी सूरू झाली.
गिरणी सूरू करणेसाठी वेळोवेळी डॉ. बाबासाहेब देशमूख व डॉ. अनिकेत देशमूख यांच्या मार्गदर्शनाखाली सातत्याने प्रयत्न सूरू होते. ही गिरणी सूरू होताच सर्व संचालक मंडळ, कर्मचारी व कामगारांना खूप आनंद झाला. तसेच स्व.डॉ. भाई गणपतरावजी देशमूख साहेब यांचे कामगार कष्टकरी जनता, शेतकरी, तसेच गोरगरीबांचे विचार नजरेसमोर ठेवून यावर्षी दिपावली निमीत्त कामगारांना ८.३३% बोनस वाटप करण्यात आला.
यानिमीत्त आयोजित कार्यक्रमास श्रीमती. रतनबाई गणपतराव देशमूख (बाईसाहेब), चेअरमन श्रीमती. कल्पनाताई शिंगाडे व व्हा. चेअरमन सौ. वंदनाताई बाबर आणि सर्व संचालक मंडळ तसेच डॉ. भाई गणपतराव देशमूख सूतगिरणीचे चेअरमन डॉ. माळी, व्हा. चेअरमन अॅड नितीन गव्हाणे, प्रसिध्द उदयोगपती मारूतीआबा बनकर, बाळासाहेब एरंडे, अवधूत कूमठेकर, बाळासाहेब झपके, विजयकूमार जाजू तसेच प्रा.तानाजी बाबर, बंडगर सर, डॉ. वाघमोडे, रूपनर, हजारे, तसेच सूतगिरणीचे कामगार कल्याण अधिकारी श्री. कृष्णदेव गावडे, चिफ इंजिनीअर श्री. बाबासाहेब बिराजदार, सल्लागार श्री. संजयकूमार अनूसे, श्री. बाळासाहेब देशमूख, सौ. फर्जाना खतिब, सौ, नंदा कूभार सौ. कविता राऊत, सौ. सूरेखा आगलावे यांचे मोलाचे सहकार्य लाभले. या कार्यक्रमास सर्व स्टाफ व कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.