विक्रमी सभेनंतर शहरातील शेकडो मुस्लीम कार्यकर्त्यांनी शेकापला सोडून हाती घेतली शिवसेनेची मशाल
सांगोला विधानसभेचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार दिपकआबा साळुंखे पाटील यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केल्यापासून सांगोला विधानसभा मतदारसंघात त्यांचा झंजावात वाढतच चालला आहे. महाविकास आघाडीकडून उमेदवारी अर्ज दाखल करत असताना केलेल्या विक्रमी शक्ती प्रदर्शनानंतर सांगोला शहरातील शेकडो मुस्लीम तरुणांनी आता शेतकरी कामगार पक्षाला कायमचा “जय महाराष्ट्र” करत दिपकआबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून हाती शिवसेनेची “धगधगती मशाल” घेतल्याने सांगोला शहरात दिपकआबांच्या नावाची जणू त्सुनामी लाटच आल्याचे चित्र पाहायला मिळाले.
सांगोला शहरातील जयभवानी चौक येथे हा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम संपन्न झाला पक्षप्रवेशानंतर नव्याने दाखल झालेल्या सर्व तरुणांसमवेत दिपकआबा साळुंखे पाटील यांनी शहरातील छत्रपती शिवाजी चौक येथे चहापान केले. जय भवानी चौक ते छत्रपती शिवाजी चौक हा प्रवास करत असताना माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांच्या सोबत असलेल्या शेकडो तरुण कार्यकर्त्यांमुळे या छोट्याशा प्रवासाला एका भल्या मोठ्या रॅलीचे स्वरूप प्राप्त झाले होते.यावेळी नाथा उर्फ सिध्देश्वर जाधव, सचिन लोखंडे, अमर लोखंडे, कमरूद्दिन खतीब, मोहसीन मनेरी, अनिल खडतरे, सुहास होनराव, तुषार इंगळे, बापू भाकरे, आलमगीर मुल्ला मोहसीन खतीब, अवी देशमुख, विनोद रणदिवे, शिवाजीनाना बनकर, पोपट खाटीक, अफजल बागवान, नुर मणेरी, मोहसीन मणेरी, शोएब इनामदार, रियाज मुजावर, जैनुद्दिन सव्वालाखे, अनिल साळुंखे, अजहर मुल्ला, जुबेर मुजावर रघुनाथ ऐवळे, जितेंद्र साळुंखे, शिवाजीराव इंगोले, सचिन शिर्के आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना दिपकआबा साळुंखे पाटील म्हणाले, सांगोला शहर तालुका आणि संपूर्ण विधानसभा मतदारसंघातील तरुणांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षात जाण्याच्या माझ्या निर्णयाचे जोरदार स्वागत केले आहे. ज्या विश्वासाने आणि अपेक्षेने मतदार संघातील तरुण शिवसेना परिवारात दाखल होत आहेत तरुणांच्या त्या विश्वासाला आणि अपेक्षांना शेवटच्या श्वासापर्यंत तडा जाऊ देणार नाही असे अभिवचन उपस्थित तरुणांना दिले. माझ्यावर स्वर्गीय आमदार काकासाहेब साळुंखे पाटील आणि स्वर्गीय ह भ प शारदादेवी साळुंखे पाटील यांचे वारकरी संप्रदायाचे संस्कार आहेत. त्यामुळे माझ्या पक्षात आणि परिवारात दाखल होणाऱ्या प्रत्येक तरुणाला इथे सन्मानाची वागणूक दिली जाईल. प्रत्येकाच्या अडीअडचणी आणि भावनांची शेवटच्या श्वासापर्यंत केली जाईल असेही शेवटी दिपकआबा साळुंखे पाटील यांनी आवर्जून नमूद केले.
क्रांतीची मशाल सांगोल्यात परिवर्तन घडविणार..!
मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षात प्रवेश करून हाती मशाल घेण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाचे सांगोला विधानसभा मतदारसंघातील तरुण, महिला, वृद्ध आणि सर्वसामान्य नागरिकांनी जोरदार स्वागत केले आहे. मी हाती घेतलेली ही शिवसेनेची आणि क्रांतीची मशाल नक्कीच यंदा सांगोला विधानसभा मतदारसंघात परिवर्तन घडवून आणेल याची मला खात्री आहे. आगामी काळात याच मशालीच्या प्रकाशात संपूर्ण सांगोला तालुका राज्यात लक्खपणे प्रकाशित केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही.
मा. आम.दिपकआबा साळुंखे
उमेदवार, महाविकास आघाडी.
२५३ सांगोला विधानसभा मतदारसंघ