सांगोला विधानसभा मतदारसंघातील 32 उमेदवारांचे अर्ज वैध
सांगोला विधानसभा मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत मंगळवारी दुपारी 3 वाजता संपली. उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या मुदती अखेर या मतदारसंघात एकूण 37 उमेदवारांनी 48 नामनिर्देशन अर्ज दाखल केले होते. या सर्व नामनिर्देशन अर्जाची छाननी निवडणूक निर्णय अधिकारी भैराप्पा माळी व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी संतोष कणसे यांच्या उपस्थितीत बुधवारी (दि.23) रोजी उमेदवार आणि त्यांच्या प्रतिनिधींच्या समोर केली. नामनिर्देशन पत्र दाखल केलेल्या उमेदवारांना सोमवारी दि.4 नोव्हेंबर रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत आपला उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहे.एकूण प्राप्त 37 उमेदवारांनी 48 अर्ज भरलेले होते त्यापैकी 32 उमेदवारांची 40 अर्ज वैध ठरवण्यात आले आहेत. तसेच 5 उमेदवारांचे अर्ज पूर्णतः अवैध ठरवण्यात आलेले आहेत तसेच 3 उमेदवारांनी दोन अर्ज भरले होते त्यापैकी एक अर्ज अवैध ठरवण्यात आला आहे.
यावेळी रेखा शहाजी पाटील (शिवसेना), कुंदन फुलचंद बनसोडे (बसपा), तानाजी शिवाजी केदार (अपक्ष), दिगंबर शंकर लवटे (अपक्ष), तुकाराम केशव शेंडगे (राष्ट्रीय समाज पक्ष) आदी 5 उमदेवारांचे अर्ज अवैध ठरविण्यात आले असल्याची माहिती मीडिया नोडल अधिकारी मिलिंद सावंत पंचायत समिती सांगोला यांनी दिली.
छाननी प्रक्रियेत दीपक बापूसाहेब साळुंखे (शिवसेना उबाठा), शशिकांत गडहिरे (बहुजन समाज पार्टी), शहाजी राजाराम पाटील (शिवसेना), धनाजी दत्तात्रय पारेकर (स्वराज्य निर्माण सेना), बाबासाहेब आण्णासाहेब देशमुख (पीझन्टस अॅन्ड वर्कर्स पार्टी ऑफ इंडिया), मारुती दगडू जाधव (महाराष्ट्र राज्य समिती), राघु येताळा घुटूकडे (न्यू राष्ट्रीय समाज पार्टी), डॉ.सुदर्शन मुरलीधर घेरडे (बळीराजा पार्टी), सोमा गुलाब मोटे (राष्ट्रीय समाज पक्ष), श्री.अतुल प्रभाकर पवार (अपक्ष), अनिकेत चंद्रकांत देशमुख (अपक्ष), अनिल शेंडगे (अपक्ष), श्री.उमेश ज्ञानू मंडले (अपक्ष), श्री.एकनाथ हणमंत शेंबडे (अपक्ष), किरण तानाजी साठे (अपक्ष), गोविंद अंबादास कोरे (अपक्ष), दत्तात्रय राजकुमार टापरे (अपक्ष), धरती अतुल पवार(अपक्ष), परमेश्वर पांडुरंग गेजगे (अपक्ष), बाबासाो गणपत देशमुख (अपक्ष), बाळासाहेब नामदेव इंगोले (अपक्ष), मोहन विष्णू राऊत (अपक्ष), रणसिंह विठ्ठल देशमुख (अपक्ष) ,राजरत्न जनार्दन गडहिरे(अपक्ष), राजाराम दामू काळेबाग (अपक्ष), विनोद बाबुराव बाबर(अपक्ष), संग्रामसिंह नेताजी पाटील (अपक्ष), संजय बिरु हाके (अपक्ष), संजय वसंत पाटील (अपक्ष), हरिदास बापुसो वाळके (यादव) अपक्ष, श्री.हरिश्चंद्र विठोबा चौगुले (अपक्ष), श्री.ज्ञानेश्वर संभाजी उबाळे (अपक्ष), आदी 32 जणांचे उमेदवारी अर्ज वैध ठरले आहेत.