भाळवणी गटातील असंख्य कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षात प्रवेश केल्यापासून सांगोला विधानसभा मतदारसंघात दररोज हजारो कार्यकर्ते शिवसेना पक्षाचे पक्ष प्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून या परिवारात सामील होत आहेत. सांगोला विधानसभा मतदारसंघातील याच सर्वसामान्य जनतेच्या विश्वासावर सांगोला विधानसभा मतदारसंघाचा चेहरा मोहरा बदलणार असल्याचा निर्धार महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार माजी आमदार दिपकआबा साळुंखे यांनी व्यक्त केला
सांगोला विधानसभा मतदारसंघातील भाळवणी गटातील केसकरवाडी ता.पंढरपूर येथील शेकडो कार्यकर्त्यांनी दिपकआबा साळुंखे पाटील यांच्या उपस्थितीत शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला. प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांचे स्वागत करून त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणार असल्याचे दिपकआबांनी सांगितले.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत दिपकआबा साळुंखे पाटील यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केल्यानंतर सांगोल्यात शिवसेनेत प्रवेश करणाऱ्या कार्यकर्त्यांची संख्या वाढत चालली आहे. उध्दव ठाकरेंच्या शिवसेनेतून दिपकआबा साळुंखे पाटील यांना उमेदवारी जाहीर होताच सांगोला विधानसभा मतदारसंघातील भाळवणी गटातील केसकरवाडी ता.पंढरपूर येथील देविदास केराप्पा जावीर, दत्तात्रय ज्ञानेश्वर ढोबळे, दत्तात्रय मल्हारी ढोबळे, तुकाराम दत्तात्रय ढोबळे, मारुती बलभीम ढोबळे, मयूर नवनाथ बुधेराव, ज्ञानेश्वर बाळासाहेब बुधेराव, राजेंद्र गंगाधर गुजरे, सोमनाथ पांडुरंग बुधेराव, आसिफ शहाजहान शेख, लक्ष्मण उत्तम सुरवसे, अर्जुन संतोष जावीर, चैतन्य सुनील बिरलिंगे यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी दिपकआबा साळुंखे पाटील यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश जाहीर प्रवेश केला. यावेळी सुनील नामदेव बिरलिंगे, भीमराव संतोष जावीर, तानाजीकाका पाटील, शिवाजीराव जावीर, शाहीर सुभाष गोरे उपस्थित होते.
भाळवणी गटातून दिपकआबांना विक्रमी मताधिक्य देणार..!
आजवर सांगोला विधानसभा मतदारसंघातील नेत्यांनी निवडणुका झाल्या की भाळवणी जिल्हा परिषद गटाकडे अपेक्षित लक्ष दिले नाही त्यामुळे या गटातील जनता आता त्याच त्या नेत्यांच्या आश्वासनाला कंटाळली आहे. म्हणून भाळवणी जिल्हा परिषद गटातील सर्वसामान्य जनतेने आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार दिपकआबा साळुंखे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहण्याचा निर्णय घेतला आहे. भाळवणी जिल्हा परिषद गटातून दिपकआबांना विक्रमी मताधिक्य देण्याचा आम्ही प्रयत्न करणार असल्याचे पक्षात नव्याने दाखल झालेल्या कार्यकर्त्यांनी स्पष्ट केले.