चिंचोली येथील कार्यकर्त्यांनी आमदार शहाजीबापू पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत केला जाहीर प्रवेश
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत सांगोला तालुक्यातील चिंचोली येथील कार्यकर्त्यांनी पाणीदार आमदार शहाजीबापू पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे. सध्या शिवसेनेत प्रवेश करणाऱ्या युवा कार्यकर्त्यांची संख्या वाढत आहे.
तरुणांची फळी आमदार शहाजीबापू पाटील यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहत आहे .सांगोला तालुक्यातील चिंचोली गावातील असंख्य युवा कार्यकर्त्यांनी बुधवार दिनांक 30 ऑक्टोबर रोजी आमदार शहाजीबापू पाटील यांच्या जनसंपर्क कार्यालयामध्ये शिवसेनेत जाहीर प्रवेश करित आमदार शहाजीबापू पाटील यांना समर्थ साथ देऊ व येणाऱ्या 2024 च्या विधानसभा निवडणुकीत आमदार शहाजीबापू पाटील यांना निवडून आणण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करू असे आश्वासन यावेळी दिले . शिवसेनेत पक्षप्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांना आमदार शहाजीबापू पाटील यांनी शुभेच्छा देत अभिनंदन केले.
पक्षप्रवेशावेळी माजी नगराध्यक्ष रफिकभाई नदाफ, युवा सेना जिल्हा संपर्कप्रमुख सागरदादा पाटील, शिवसेना तालुकाप्रमुख दादासाहेब लवटे, युवा सेना तालुकाप्रमुख गुंडादादा खटकाळे युवासेना शहरप्रमुख समीर पाटील , विष्णुपंत केदार यांच्यासह आदी मान्यवर, शिवसेना, युवा सेना पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सांगोला तालुक्यातील चिंचोली येथील युवा कार्यकर्त्यांनी आमदार शहाजीबापू पाटील यांच्या विकासाच्या मुद्द्यावरती एकत्रित येऊन शिवसेनेत प्रवेश करित आमदार शहाजीबापू पाटील यांना विधानसभा निवडणुकीत मोलाची साथ देण्याचे जाहीर केले.
यावेळी चिंचोली गावातील ग्रामपंचायत सदस्य विठ्ठल घाडगे, सतीश घाडगे, अंबादास शिनगारे, दादा जाधव ,समाधान घाडगे, संजय घाडगे हे मान्यवर उपस्थित होते.