महाराष्ट्र

सांगोला शहराच्या मलनिःसारण टप्पा क्रमांक 1 चे काम प्रगतीपथावर सुरू

*सांगोला नगरपरिषद बुलेटिन – ऑक्टोबर 2024*

स्वच्छ सर्वेक्षण २.० व माझी वसुंधरा अभियान 4.0 अंतर्गत सांगोला शहरातील प्रत्येक नागरिकांनी दिवाळी साजरी करताना प्रदूषणमुक्त व पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्याचे आवाहन सांगोला नगरपरिषदेचे मुख्याधिकारी डॉ.सुधीर गवळी यांनी केले आहे.

*भुयारी गटार योजना* – सांगोला शहराच्या मलनिःसारण टप्पा क्रमांक 1 चे काम प्रगतीपथावर सुरू आहे, सदर योजनेअंतर्गत शहरात विविध ठिकाणी HDPE DWC 150 MM व्यासाची पाईप लाईन 35810.25 मीटर, HDPE DWC 250 MM व्यासाची पाईप लाईन 84.7 मीटर टाकण्यात आली आहे. व 1434 Manhole पूर्ण झाले असून 43 Manhole चे काम सुरू आहे. तसेच शहरात विविध ठिकाणी 497 Property Chamber पूर्ण झाले असून 28 Property Chamber चे काम सुरू आहे.

सांगोला शहर व वाडीवस्ती येथील पाणी वापर मिटर रिडींग घेणेचे काम दि. 15/10/2024 पर्यंत पुर्ण झाले आहे.
दि. 01/04/2024 ते दि.30/09/2024 अखेर पाणीपट्टी मागणी बिले तयार करून त्याचे वाटप करण्याचे काम चालू आहे. सोबत पाणीपट्टी वसुली चालू असून सर्व नागरिकांना पाणीपट्टी भरण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

*जन्म – मृत्यू विभाग*
1. शासन निर्णयानुसार दिनांक 1 मे 2024 नंतर जन्माला आलेल्या व्यक्तीला जन्म दाखल्यावर आईच्या नावाचा समावेश करण्यात येत आहे.
2. आधारकार्ड अपडेट तसेच 10 वी /12 वी बोर्ड परीक्षेचे फॉर्म भरण्यासाठी व इतर शैक्षणिक कामासाठी QR कोड असलेले ऑनलाईन जन्म दाखले नागरिकांच्या प्राप्त अर्जानुसार नगरपरिषद मधून वितरीत केले जातात.
3. सांगोला शहरात झालेल्या जन्म मृत्यू ची नोंदी ह्या दर आठवड्याच्या सोमवारी प्रत्येक दवाखान्यात फोन करून माहिती मागवून 100 % नोंदी घेतल्या जातात.

विद्युत विभाग
१. शहरातील ४००० स्ट्रीट लाईट्सचे देखभाल दुरुस्तीचे काम नियमित सुरू असून कोणतीही लाईट तक्रार दोन दिवसात नियमितपणे निर्गत केली जात आहे.
२. सांगोला नगरपरिषद हद्दीत नागरी दलित्तेतर सुधारणा योजनेअंतर्गत स्ट्रीट लाईट सोय नसलेल्या शहरातील विविध भागात 369 पोल उभा करणेत आलेले असून स्ट्रीट लाईट व्यवस्था करण्यात आलेली आहे.

HTML img Tag Simply Easy Learning    

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!